
Guru Gobind Singh Jayanti 2025 Wishes In Marathi: शीख समुदायासाठी सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक, गुरु गोविंद सिंग जयंती हा 10 वे शीख गुरू गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो.
शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला. मात्र, तिथीनुसार त्यांचा जन्म पौष शुक्ल सप्तमीला झाला. यामुळे त्यांची जयंती डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येते.
या शुभ दिनी लाखो शीख बांधव एकत्र येतात आणि गुरु गोविंद सिंग याना श्रद्धांजली अर्पण करतात. भारत आणि जगभरातील अनेक शीख बांधव हा दिवस प्रार्थना, कीर्तन, नगर कीर्तन नावाच्या मिरवणुका आणि जगभरातील गुरुद्वारांमध्ये सामुदायिक भोजन (लंगर) देऊन खूप उत्साहात साजरा करतात.