नुकतीच गुरुपौर्णिमा पार पडली... त्यानिमित्ताने माझ्या आणखी एका गुरूंबद्दल लिहिण्याची संधी मी कशी सोडू? पंडिता सुधाताई पटवर्धन – ज्या फक्त माझ्याच नाही, तर माझी आई आणि गौतमी त्या दोघींच्याही गुरू. आमच्या आयुष्यामध्ये जे काही शुद्ध, कोमल, तीव्र सूर आले ते त्यांच्यामुळे. गुरू कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधाताई.