esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

2027 मध्ये जगात कोणीच नसेल; Time Travel व्हिडिओ व्हायरल

2027 मध्ये जगात कोणीच नसेल; Time Travel व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
शरयू काकडे

आजच्या काळात कधीही काहीही घडू शकते. लोक कित्येक गोष्टी सांगतात. कोणी एलिअन्स आणि युएफो दिसत असल्याचे सांगतात तर कोणी एलियनने अपहरण केल्याचा दावा करत. काही महिलांनी तर एलिअनसोबत शारीरिक संबध असल्याचा देखील दावा करतात. अशाच एका व्यक्तीने सोशल मिडियावर असा दावा केला आहे की तो स्वत: भविष्यात असल्याचे अडकल्याचा दावा करत असल्यामुळे चर्चेत आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, तो 2027मध्ये अडकला आहे. भविष्यामध्ये त्याला कोणीही मनुष्य दिसत नाहीत. हा व्यक्ती सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत असून ते 2027मध्ये असल्याचा दावा करत आहे.

2027 मध्ये पोहचलेला हा टाईम ट्रव्हलर अचानक आपल्या दाव्यांमुळे चर्चेत आला आहे. त्याने टिकटॉक अकाऊंटवर काही व्हिडिओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओमध्ये रस्ते, मॉल आणि इमारती दिसत असून निर्मनुष्य आहे. या व्हिडिओमध्ये एकही व्यक्ती दिसत नाही. त्या व्यक्तीचे मत आहे की ''हे सर्व व्हिडिओ 2027 मधील आहेत. आजपासून 6 वर्षांनतर जग असे असेल. तो चूकून भविष्यात पोहचला आहे आणि त्याला परत येण्याचा मार्गही सापडत नाहीये. अशामध्ये त्याच्यासाठी 2027मध्ये एक एक दिवस घालवणे अवघड होत आहे.''

लोकांसोबत शेअर करतोय व्हिडिओ

भविष्यामध्ये पोहचलेल्या या व्यक्तीचे नाव जेवियर असल्याचे समजते. जेवियरने टिकटॉकवर @unicosobreviviente नावानी अकाऊंट उघडले असून त्यावर कित्येक व्हिडिओ शेअर केले आहे. तसेच तो इंस्टाग्रामवरही अॅक्टिव्ह आहे. हे सर्व व्हिडिओ स्पेनमधील आहे पण 2027 वर्ष सुरू असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. तिथे फिरताना त्याने कित्येक व्हिडिओ बनविले आहे आणि ते टिकटॉकवर शेअर केले आहेत. जेवियर13 फेब्रुवारीपासून भविष्यामध्ये अडकला आहे. त्याने सांगितले की, ''अचानक एक दिवस तो उठला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. त्यानंतर पूर्ण शहरात ते एकटाच असल्याचे त्याला समजले.

जेवियरने त्याच्या इंन्सटा अकाउंटच्या बायोमध्ये लिहिले आहे की तो JESP-8827 एक्सपिरमेंट आहे. 2027 मध्ये टाईम ट्रव्हल केला असून तो समांतर जगात आहे''

8 महिन्यांपासून राहतोय एकटाच

जेवियरने सांगितले की तो जेव्हा होता तेव्हा 13 फेब्रूवारी 2027 दिवस होता. त्यानंतर त्याला एकही मनुष्य दिसलेला नाही. त्याला समजत नाहीये की तो भविष्यातून परत कसा येऊ शकतो? सगळीकडे शांतता आहे.

जेवियर जे सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ''2027मध्ये अडकलेला व्यक्ती आजच्या तारखेला टिकटॉकवर कसा काय पोस्ट करू शकतो'' तसेच जेवियर जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतो त्यात कुठेच कोणी दिसत नाही. त्यामुळे असेही असू शकते की हा व्यक्ती व्हिडिओज व्हायरल करण्यासाठी तेव्हाच व्हिडिओ शूट करतो जेव्हा त्याच्या आसपास कोणी नसेल.

एकीकडे जेवियर 2027मध्ये फक्त तोच जिवंत असल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे काही लोकांनी व्हिडिओमध्ये जहाज जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे लोकांनी त्याला खोटारडा असल्याचे म्हटले आहे.

loading image
go to top