Hair Care Tips : कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी लिंबाच्या सालींचा अशा प्रकारे वापर करा, जाणून घ्या
तसं तर केसांमध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफ होणे ही एक सामान्य समस्या आहे. कोंडा होण्यामागे विविध कारणे असू शकतात. ही समस्या दूर व्हावी यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. काही जण कोंडा रोखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने शॅम्पूसारख्या उत्पादनांचा वापर करतात. तर काही आहारामध्ये बदल करतात. आज आम्ही तुम्हाला एक अतिशय स्वस्त आणि सोपा उपाय सांगणार आहोत. या घरगुती उपायाचा वापर केल्याने कोंड्याची समस्या तर दूर होईलच पण केसांना चमकही येईल.
लिंबाच्या सालीचा रस काढल्यानंतर त्याचे तुम्ही काय करता? अनेकजण त्याची साल फेकून देतात. पण ही साल खूप उपयुक्त आहे. या सालीच्या मदतीने तुम्ही कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला लिंबाच्या सालीचा वापर केसांवर कसा करू शकतो हे सांगणार आहोत.
लागणारे साहित्य
10 ते 15 लिंबाची सालं
1 ग्लास पाणी
1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल
1 टेबलस्पून गुलाबजल
बनवण्याची पद्धत
पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हाही तुम्ही स्वयंपाकघरात लिंबाचा रस वापरता तेव्हा फेकून देण्याऐवजी लिंबाची सालं गोळा करावी. ही लिंबाची सालं तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. 10 ते 15 लिंबाची सालं गोळा झाल्यावर, तुम्ही ते जेल बनवण्यासाठी वापरावे.
यासाठी एका भांड्यात लिंबाची सालं घेऊन त्यात पाणी टाका. पाणी अर्धे होईपर्यंत आणि लिंबाची सालं मऊ पडेपर्यंत उकळू द्या.
लिंबाची सालं पाण्यात पूर्णपणे मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. आता तुम्हाला ते मॅश करून व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्यात टाकावे लागेल. तुम्ही 1 चमचे गुलाबजल देखील घालू शकता.
जेल तयार झाल्यावर तुम्ही ते काचेच्या बाटलीत भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. आता केसांच्या मुळांना लावा आणि 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवा.
चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही हे जेल आठवड्यातून एकदा वापरावे. यामुळे कोंड्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल.