esakal | केस धुतल्यानंतरही येते डोक्यात खाज? नका करू दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

hair

केस धुतल्यानंतरही येते डोक्यात खाज? नका करू दुर्लक्ष

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

साधारण केस धुतल्यानंतर केसांमध्ये खाज येते तर याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण कोंड्याची समस्या वाढल्यास मायक्रोबियल इंफेक्शन होऊ शकते. म्हणून स्काल्प कोरडे राहू देऊ नका.डोक्यात खाज येण्याची अनेक कारणे असली तरी केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळे ही समस्या अधिक वाढते. तर जाणून घेऊया त्यावरील घरगुती उपाय...

कोरफड

कोरफडीचा वापर केस सुंदर, मजबूत आणि डॅंड्रफ फ्री होण्यासाठी होतो. कोरफड जेलने केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल. कोरफड बहुगुणी आहे. केसांच्या, त्वचेच्या सौंदर्यासाठी कोरफड अतिशय उत्तम ठरते.

लिंबू आणि मध

लिंबाच्या रसात मध मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा आणि १५ मिनिटांनी केस धुवा. कोंडा, खाजेच्या समस्येपासून सुटका होईल. लिंबात अॅँटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुणधर्म असतात.

ऑईल

टी ट्री ऑईलमध्ये अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुण असतात. त्यामुळे केसातील खाजेपासून सुटका मिळते. २ चमचे टी ट्री ऑईलमध्ये चमचाभर ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळाशी लावून मसाज करा. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

अॅपल व्हिनेगर

डोक्यातील घाग साफ करण्यासाठी याचा खूप वर्षांपासून उपयोग होत आहे. पाऊण कप पाण्यात पाव कप अॅपल व्हिनेगर घालून केसांना मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

loading image