Coconut Oil मध्ये लिंबू मिसळा आणि पहा कमाल...

दरवेळी केसांवर वेगवेगळ्या प्राॅडक्टचा प्रयोग केल्याने देखील केसांच्या समस्या अधिक वाढू लागतात. यासाठीच आम्ही तुम्हाला एक अगदी साधा सोपा आणि स्वस्त असा पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील
Hair Care Tips
Hair Care TipsEsakal

अलिकडे वाढतं प्रदूषण तसचं केमिकलयुक्त हेअर प्राॅडक्ट Hair Products आणि चुकीच्या आहार पद्धती यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत.

केस गळणे, कोंडा, स्कॅल्प इंफेक्शन तसचं लवकर केस पांढरे होणं Gray Hair अशा केसांच्या विविध समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. Hair Care Tips in Marathi Coconut Oil and Lemon will be benefitial

केसांच्या विविध समस्यांसाठी Hair Problems बाजारात अनेत प्राॅडक्ट उपलब्ध आहेत. मात्र यात केमिकलचा Chemicals भडिमार पाहायला मिळतो. तर अनेकदा वाढत्या स्पर्धेमुळे बाजारात इतके वेगवेगळे प्राॅडक्ट पाहायला मिळतात की नेमकं काय वापरावं हे अनेकांना कळतं नाही.

दरवेळी केसांवर वेगवेगळ्या प्राॅडक्टचा प्रयोग केल्याने देखील केसांच्या समस्या अधिक वाढू लागतात. यासाठीच आम्ही तुम्हाला एक अगदी साधा सोपा आणि स्वस्त असा पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील. 

भारताता अनेक वर्षांपासून केसांसाठी नारळाचं तेल वापरलं जातं आहे. हेच नारळाचं तेल आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही केसांच्या समस्या दूर करू शकता.

नारळाचं तेल आणि लिंबू हे तुमच्या केसतील ब्लड सर्क्युलेशन चांगलं कऱण्यासोबतच केसांच्या मुळांना पोषण देण्याचं काम करतात. नारळ तेल आणि लिंबू हे एकत्रितपणे तुमच्या केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं 

हे देखिल वाचा-

Hair Care Tips
Hair Conditioner : महागड्या कंडिशनर्सना करा बाय-बाय; आता घरच्या घरी बनवा नॅचरल हेअर कंडिशनर!

कसं वापरावं लिंबू आणि नारळ तेल

केसांमध्ये लिंबू आणि नारळाचं तेल लावणं अत्यंच सोप आहे. यासाठी तुम्ही एका वाटीत २ चमचे नारळाचं तेल घ्या. ते हलकं कोमट करा. या तेलात एका लिंबाचा रस मिसळा.

आता हे तेल केसांना आणि केसांच्या मुळांना लावा. हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर १ तास तेल केसांना राहू द्या. त्यानंतर सौम्य किंवा हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. 

नारळ तेल आणि लिंबाचे केसांसाठी फायदे

निरोगी केसांसाठी उपयुक्त- नारळाच्या तेलामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं तर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतं.

हे दोन्ही एकत्रित जेव्हा तुम्ही केसांना लावता तेव्हा ब्लड सर्कुलेशन सुरळीत होण्यास मदत मिळते. याशिवाय हे केसांच्या मुळांना पोषण मिळाल्याने केसांची वाढ झपाट्याने होते. तसचं केस मजबूत होण्यासाठी देखील या उपाय फायदेशीर ठरतो. 

पांढऱ्या केसांची चिंता मिटेल- अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांसाठी नारळाचं तेल आणि लिंबू फायदेशीर आहे. नारळ तेल आणि लिंबू एकत्र आल्याने केसातील कोलेडन बूस्ट करण्यास मदत करतात. तसचं केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळाल्याने केस काळे राहण्यास मदत होते. 

कोंडा कमी होण्यास मदत- केसांतील कोंडा कमी होण्यासाठी नारळाचं तेल आणि लिंबू गुणकारी ठरतं. या दोघांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने स्कॅल्पमधील इंफेक्शन तसचं कोंडा दूर होण्यास मदत होते.  तसचं या दोघांमध्ये अँटी फंगल गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्याने कोंड्यासाठी हे रामबाण उपाय आहे. 

निस्तेज केसांसाठी – नारळाचं तेल आणि लिंबूमुळे केसांची चमक वाढते. नारळाचं तेल आणि लिंबामध्ये असेल्या अॅसिडिक गुणधर्मामुळे निस्तेज केसांना चमक येण्यास मदत मिळते.

हे देखिल वाचा-

Hair Care Tips
Hair Loss: पुरुषांपेक्षा 60 टक्के ज्यादा महिलांचे केस गळतात; जाणून घ्या काय आहे कारण 

केस गळणे होतं कमी- अनेकदा केस गळतीच्या समस्येमुळे केसांची घनता कमी होते. खास करून बदलत्या वातावरणामुळे केस गळण्याची समस्या अधिक वाढते.  अशा वेळी नारळाचं तेल आणि लिंबाचा एकत्रित वापर फायदेशीर ठरू शकतो.

नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन के तर लिंबामध्ये विटामिन सी मुबलकप प्रमाणात उपलब्ध असतं. हे दोन्ही गुणधर्म मजूबत आणि निरोगी केसांसाठी गरजेची असतात. यामुळे केस गळणं कमी होवून ते दाट होतात. 

अशा प्रकारे नारळाचं तेल आणि लिंबू या केवळ दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही केसांच्या अनेक समस्या दूर करु शकता. यासाठी आठवड्यातून किमान २ वेळा या तेलाने केसांना मालिश करणं गरजेचं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com