- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आजकाल किशोरवयीन मुलींपासून वयस्क स्त्रियांपर्यंत बहुतांश महिलांना केसगळती, टक्कल पडणे, केस पातळ होणे, त्वचेवर पुरळ, डाग, कोरडेपणा, ग्लोचा अभाव अशा समस्या भेडसावत आहेत. या समस्या दवाखान्यातील औषधांव्यतिरिक्त योग, प्राणायाम, ध्यान, संतुलित आहार व दिनचर्येच्या सुसंगतीनेही दूर करता येतात.