Hair Care: नखे एकमेकांना घासल्याने खरंच केसांची वाढ होते काय? वाचा बाबा रामदेव यांनी केलेला दावा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Care

Hair Care: नखे एकमेकांना घासल्याने खरंच केसांची वाढ होते काय? वाचा बाबा रामदेव यांनी केलेला दावा...

Health News: तरूण पिढीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांना अनेक समोस्यांना जावे लागते. त्यातलीच एक समस्या म्हणजे केस गळती. योग गुरू रामदेवबाबा यांनी असा दावा केला होता की हाताची नखे एकमेकांना घासल्याने केलांची वाढ होते. मात्र यामागे सत्य काय आहे, हा दावा किती खरा आहे ते जाणून घेऊया.

बालमय एक आसन आहे. हे रिफ्लेक्सोलॉजीच्या तत्वावर कार्य करतं. वैज्ञानिकांच्या मते, हातांची नखे रक्तवाहिन्यांद्वारे मज्जासंस्थेशी जोडलेली असतात. जर तुम्ही दोन्ही हातांची नखे घासली तर रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ लागतो. त्यामुळे डोक्याचाही रक्तपुरवठाही वाढतो व त्याचा फायदा केसांची वाढ होण्यास होतो.

केसांची वाढ कॉर्टिकल पेशींमुळे होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पेशी केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेल्या असतात. जेव्हा नखे ​​एकत्र घासतात ते केराटिनच्या वाढीस प्रोत्साहन देते. ज्यामुळे कॉर्टिकल पेशी तयार होतात आणि डोक्याचे केस मजबूत होत जातात.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

नोट: आसन सर्वांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाचे रुग्ण आणि गर्भवती महिलांनी हे आसन करणे टाळावं. त्याचसोबत ज्यांची अँजिओग्राफी झाली आहे त्यांनीही हे आसन करू नये. नाहीतर तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.