esakal | लूकमध्ये बदल करायचा आहे या हेअरस्टाईल टिप्सचा होईल फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

लूकमध्ये बदल करायचा आहे 'या' हेअरस्टाईल टिप्सचा होईल फायदा

लूकमध्ये बदल करायचा आहे 'या' हेअरस्टाईल टिप्सचा होईल फायदा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे: लूकमध्ये बदल करायचा असेल तर केसांची रचना त्यामध्ये महत्त्वाची ठरते. तसेच बऱ्याचदा सलूनमध्ये तुमच्या फेस कटनुसार तुम्हाला कोणती हेअरस्टाईल सूट करते हे देखील सांगितले जाते. पण हेअर कट करताना फक्त फेस कटला महत्त्व देऊन चालत नाही तर त्यावेळेस इतर अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं की सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यात शॉर्ट हेअर स्टाईल ठेवणे योग्य असते. चला तर जाणून घेऊया कधी कुठली हेअरस्टाईल असली पाहिजे.

स्ट्रेस हेअर्स-

या केसांना भरपून हेअरस्टाईल शोभून दिसतात. तरीदेखील हा हेअर कट मारताना काही टेक्सचरचे ध्यान ठेवले पाहिजे. केस जर पातळ असतील पिक्सी हेअर कट करावा त्यामूळे तुमचे केस चांगलेच घनदाट दिसतील.

घनदाट आणि कुरळे-

अशा केसांना एसिमेट्रिक कट चांगला दिसतो. जर तुम्ही बॉब करत असाल तर केसांची चांगली काळजी घ्यावी लागेल.

ड्राय हेअर-

रफ आणि फ्रिजी केसांसाठी शॉर्ट हेअरस्टाईल परफेक्ट ऑप्शन आहे. पण टेक्सचर व्यवस्थित ठेवण्यासाठी कंडीशनर वापरावा.

ब्रॉड फोरहेड-

जर तुमचे कपाळ मोठे असेल तर फ्रिंज ठेऊन याला लहान केल्यास परफेक्ट लुक येऊ शकतो.

चीक्स-

हेअरकट करताना गालांच्या रचनेवरही फोकस केले पाहिजे. जर तुमचे गालांची हाडे मोठी असतील तर त्याला पिक्सी हेअरकट योग्य दिसेल.

ब्लॉंड कर्ली हेअर कट-

यामध्ये केसांना हेवी लुक देण्यासाठी लेअरमध्ये कट केले जातात आणि त्यानंतर त्याचे कर्ल्स बनवून स्टायलिश टच दिला जातो.

loading image