esakal | अळीव खाण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे!  केस, त्वचेसाठी वरदान 
sakal

बोलून बातमी शोधा

aliv.jpg

अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. अळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ” क” आहे. अळीवामध्ये ॲंटिऑक्‍सिडंट्‌स आहे व रक्त शुद्धी करणारे गुण आहेत. अळीवाचे सेवन हे तरूणांनी करणे फायदेमंद आहे.

अळीव खाण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे!  केस, त्वचेसाठी वरदान 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. अळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ” क” आहे. अळीवामध्ये ॲंटिऑक्‍सिडंट्‌स आहे व रक्त शुद्धी करणारे गुण आहेत. अळीवाचे सेवन हे तरूणांनी करणे फायदेमंद आहे. बाळंतिनिला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू किंवा खीर सेवन करायला देतात. अळीव भिजत घालून त्याला मोड आणून सॅलडमध्ये घालून सेवन केल्यास डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते. हलीव हे चिकट असतात त्याच्या सेवनाने मळविरोधाची तक्रार कमी होते.


अळीवमध्ये आयर्न भरपूर प्रमाण आहे. ह्याच्या सेवनाने रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ह्याचे रोज सेवन केल्याने एनिमियाची तक्रार दूर होते. गर्भवती महिलांच्या डेलिव्हरी नंतर आळीव चे लाडू किंवा खीर सेवन करण्यास दिली जाते. आपल्या भारतातील स्त्रीयांमद्धे रक्ताचे प्रमाण कमी असणे ही नेहमीची बाब आहे. त्या महिलानी रोज आळीवचे सेवन करावे.

केसांसाठी आळीव फायदेमंद
आळीवच्या बियांचे सेवन करणे हे केसाच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. ह्या बियांमद्धे बी-कॉम्प्लेक्स व विटामीन असते. त्याच्या मुळे केसांची वाढ होऊन केस चमकार होतात व तुटत नाहीत. ज्याच्या केसांच्या समस्या आहेत त्यानी रोज ह्याचे सेवन करावे. आळीवच्या बियांमद्धे तेल असते व विटामीन “E” भरपूर आहे. तसेच पोषक तत्व आहेत त्यामुळे केसांमधील कोंडा डैंड्रफची समस्या दूर होते.

आपली त्वचा चांगली होते.
अळीवाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते. वाढत्या वया बरोबर शरीरावर सुरकुत्या येतात कमी होण्यास मदत होते.

हृदय रोग असणाऱ्या फायदेमंद:
अळीवमध्ये ओमेगा-3 फैटी एसिड आहे. त्यामुळे हृदय रोग असणाऱ्या व्यक्तीने जरूर सेवन करावे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते

loading image