

Share Devotional Hanuman Jayanti Greetings with Family and Friends
sakal
Hanuman Jayanti 2026: प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. धार्मिक आणि पुराणिक मान्यतानुसार, याच दिवशी वीर हनुमानाचा जन्म झाला होता. भारतासह जगभरातील भक्त त्याला मोठ्या श्रद्धेने व भक्तीने साजरा करतात. पुराणांत नमूद केल्याप्रमाणे, हनुमानाची कृपा लाभल्यास आयुष्यातील अडचणी, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. श्रीरामाच्या सेवेत हनुमानाच्या पराक्रम, निष्ठा आणि भक्तीमुळे संकटांवर विजय मिळाला, असा विश्वास प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे हनुमान जयंती हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.