- समिधा गुरू, अभिनेत्री
आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट असते. यासोबतच करिअरमध्ये यशस्वी होण्याची जबाबदारीही असते. माझ्या आयुष्यात हा टप्पा आला, तेव्हा मी ‘झी मराठी’वरील ‘अवघाची संसार’ ही मालिका करत होते. या मालिकेला सुरू होऊन दीड-दोन वर्षे झाली होती आणि मला मातृत्वाची चाहूल लागली. त्यावेळी मनात एक क्षणभरही विचार आला नाही, की मला मालिका सोडावी लागेल किंवा आता मी हे कसे सांभाळू शकते.