
Unique Marathi messages to send on Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन हा भारतासाठी खुप खास आहे. दरवर्षी 26 जानेवारीला देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 1950 मध्ये याच दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले आणि भारत प्रजासत्ताक बनला. या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. हे संविधान म्हणजे आपली राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली. तसेच हा दिवस भारताच्या लोकशाहीचे प्रतिक आहे. दरवर्षी २६ जानेवारीला देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाला खास बनवण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवाराला पुढील संदेश पाठवू शकता.