Harms of mouthwash: रोज रोज माउथवॉश करणं तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक!

दात आणि हिरड्यांचं आरोग्य उत्तम राखायचं असेल, तर माउथवॉश करण्याचा सल्ला दिला जातो.
Harms of mouthwash
Harms of mouthwashEsakal

आजकाल लोक ओरल हायजिनबाबत प्रचंड जागरुक आहेत. आपल्या तोंडाचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी अनेकजण माउथवॉशचा वापर करत असतात. दातांच्या स्वच्छतेसोबतच पूर्ण तोंडाची सफाई  करण्यासाठी माउथवॉशचा वापर केला जातो. तोंडाची नीट सफाई केली नाही, तर मुखदुर्गंधींची समस्या भेडसावण्याची शक्यता असते. जर दात आणि हिरड्यांचं आरोग्य उत्तम राखायचं असेल, तर माउथवॉश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रोज-रोज माउथवॉशचा वापर करणं ही डोकेदुखी ठरण्याचीही शक्यता असते. जाणून घेऊया, जास्त प्रमाणात माउथवॉशचा वापर केल्यामुळं नेमकं काय नुकसान होऊ शकतं.

का करतात माउथवॉश?

तोंडात असणाऱ्या बॅक्टेरियांचा निपटारा करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकाराच्या आजारांपासून वाचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्यासारख्या समस्यांपासून सुटका होत असते. त्यामुळे माउथवॉशचा वापर करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांकडून दिला जातो. त्याचप्रमाणे माउथवॉशमुळे फ्रेशनेस येण्यासही मदत होत असते. 

Harms of mouthwash
Winter 2022: हिवाळ्यात लवंगाचा चहा का प्यावा?

कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो?

माउथवॉशच्या अतिवापरामुळे आरोग्य अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. माउथवॉशमध्ये सिंथेटिक घटक असतात, जे कॅन्सरचं कारण बनू शकतात. तोंडाची सफाई करणारा माउथवॉश हा मान आणि डोक्याच्या कॅन्सरचे कारण बनण्याची शक्यता असते.

Harms of mouthwash
Tulsi Vivah 2022: तुलसी विवाहासाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य कोणकोणते आहे?

सतत माउथवॉश केल्याने तोंड कोरडे पडते. माउथवॉशमध्ये असणारे घटक तोंडातील बॅक्टेरिया तर दूर करतातच, मात्र हे करताना त्याचा परिणाम तोंडातील त्वचेवर होत असतो. माउथवॉशमुळे तोंड खरबरीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे माउथवॉशचा जास्त उपयोग करणं टाळण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो. 

तोंडात जळजळ होण्यास सुरुवात होते. कित्येक माउथवॉश तयार करताना अल्कोहोलचा वापर केला जातो. त्यामुळे तोंडात प्रचंड जळजळ होण्याची शक्यता निर्माण होते. माउथवॉशमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही घटकांमुळे तोंडाती त्वचा जळजळू लागते. तोंडात लाल चट्टे उठण्याचीदेखील शक्यता त्यामुळे निर्माण होते. माउथवॉशचा रोज वापर केल्यामुळे दातांचे आरोग्यही बिघडू शकते. माउथवॉशमुळे दातांवर डाग पडू लागतात. दात कमकुवत होतात आणि खरखरीत व्हायला लागतात. त्यामुळे दातांशी संबंधित समस्यांना सुरुवात होते. 

Harms of mouthwash
Tulsi Vivah Puja : शास्त्रोक्त पद्धतीने करा तुळशी विवाह; जाणून घ्या मंत्रासह संपुर्ण विधी

पर्यायी नैसर्गिक माउथवॉश कोणते आहेत?

बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक माउथवॉशमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा माउथवॉश करण्याचा सल्ला देण्यात येतो. आपण घरी कडुलिंब किंवा पुदिन्यापासून नैसर्गिक माउथवॉश तयार करू शकतो. याचा रोजच्या रोज वापर करायलाही हरकत नसते. यात कुठलेही केमिकल्स नसल्यामुळे त्याचा आरोग्यावर काहीही विपरित परिणाम होत नाही.

टिप- माउथवॉशमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि निरीक्षणे आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com