%20-%202024-09-06T085214.014.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Hartalika 2024: गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी जल्लोषात सुरू आहे. पण गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका साजरी केली जाते. हिंदू धर्मात हरतालिकेला खुप महत्व आहे. या दिवशी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका साजरी केली जाते. यंदा ६ सप्टेंबरला हा सण साजरा केला जात आहे. या दिवशी मनोभावे भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात.
पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. त्यानंतर भगवान शिव पार्वतीला पती म्हणून प्राप्त झाले होते. शास्त्रानुसार, अविवाहित मुली देखील हे व्रत करू शकतात. पण या दिवशी काही चुका करणे टाळले पाहिजेत हे जाणून घेऊया.