Cold Cough Tips: सर्दी-खोकला असेल तर आहारात समावेश करा 'या' फळाचा

चिक्कूमध्ये असणारे अँटी-व्हायरल शरीरात बॅक्टेरियाला प्रवेश करू देत नाहीत.
chikoo
chikooesakal

दिल्ली : गेल्या दोन दिवसापासून वातावरण उष्मा खूप वाढला आहे. कधी थंड वारे, तर कधी पाऊस आणि आता कडक ऊन. हवामानातील या बदलामुळे सहज आजारपण येऊ लागले आहे. कोरोना कालावधी नंतर हे प्रमाण खूपच वाढले आहे. यासाठी त्या-त्या हंगामानुसार तुम्ही आहारात फळांचा समावेश करा. जसे की आता चिक्कूचा (Sapodilla) हंगाम आहे. तुम्ही याचा वापर आहारात जाणीवपूर्वक करायला हवा. यामुळे सर्दी- खोकला सारखे आजार तर बरे होतातच शिवाय यामुळे इतर व्याधी पासून सुटका मिळवता येते. याचा तुम्हाला नेमका काय फायदा होऊ शकतो जाणून घेऊया...

Summary

जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यावर चिक्कू हे रामबाण उपाय आहे.

जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यावर चिक्कू हे रामबाण उपाय आहे. याशिवाय जर तुम्हाला नेहमी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर यामुळे बरा होण्यास मदत होते.

चिक्कूमध्ये अनेक अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्याचा फायदा शरीरात बॅक्टेरियाला प्रवेश करू देत नाहीत.

जर तुम्हाला अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर चिक्कू नक्की ट्राय करा. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता दूर करतात. तसेच इतर संक्रमणांशी लढण्याची ताकद देतात.

चिक्कू सोबत त्याच्या बियांचा ही फायदा होतो. बिया बारीक करून खाल्ल्याने मूत्रासोबतच मुतखडा दूर होतो. याशिवाय किडनीच्या आजारांपासूनही संरक्षण मिळते. चिक्कूमध्ये व्हिटॅमिन-ए आणि बी असते. ज्याचा फायदा कर्करोगासारख्या घातक आजार ही बरा करण्यासाठी होतो. तसेच अँटिऑक्सिडेंट, फायबर आणि इतर पोषक घटक असल्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखतात.

चिक्कूमध्ये व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ते खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात.

त्याचबरोबर यात लेटेक्सचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे दातांची पोकळी भरण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

यात ग्लुकोज असते ज्याचा फायदा शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांना उर्जेची खूप गरज असते. अशा लोकांनी चिकू नियमित खावा.

चिक्कूमुळे तुमचे मन शांत राहते याशिवाय तणाव कमी करण्यास याची मदत होते.

चिक्कूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत ठेवायची असतील तर चिकू नक्की खा. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते जे हाडांसाठी खूप महत्वाचे असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com