Health Care News: निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोरफडीचा रस पीत असाल तर ही चूक करू नका, नाहीतर...

अशाप्रकारे कोरफडीचा रस सेवन केल्यास नुकसान होऊ शकते, या समस्यांचा धोका वाढतो!
aloe vera juice
aloe vera juicesakal

कोरफड आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. साधारणपणे लोक सकाळी कोरफडीचा ज्यूस घेतात. असे मानले जाते की कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, पण त्याचा तुमच्या पचनक्रियेवरही सकारात्मक परिणाम होतो.

कोरफडीचा ज्यूस एक हायड्रेटिंग पेय आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

पण कोरफडीच्या रसाचे हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा त्याचे योग्य सेवन केले जाते. कोरफडीचा ज्यूस पिताना सामान्यतः लोक काही छोट्या चुका करतात. तुम्हाला कोरफडीचा ज्यूस पिताना कोणत्या चुका टाळाव्यात ते सांगतो.

aloe vera juice
Papaya For Skin : चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी फायदेशीर आहे पपई, जाणून घ्या ‘हे’ फेसपॅक्स

काही लोक निरोगी राहण्यासाठी कोरफडीचा ज्यूस मोठ्या प्रमाणात घेण्यास सुरुवात करतात. पण प्रत्यक्षात तुम्ही हे करणे टाळले पाहिजे. कोरफडीचा ज्यूस पचनसंस्थेसाठी चांगला मानला जातो, परंतु जेव्हा ते जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा त्याच्या लैक्सेटिव इफेक्टमुळे तुम्हाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला पोटाशी संबंधित इतर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

अनेक वेळा लोक कोरफडीचा ज्यूस योग्य प्रकारे घेत नाहीत. त्याची चव कडू असू शकते आणि जेव्हा आपण ते पाणी किंवा इतर कोणत्याही ज्यूसने डायलूट करत नाही, तेव्हा ते सेवन करणे खूप कठीण होते. एवढेच नाही तर असे केल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यताही खूप वाढते.

चुकीच्या वेळी पिणे

कोरफडीचा रस शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करतो. पण चुकीच्या वेळी घेतल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. काही लोक जेवणाच्या आधी किंवा नंतर कोरफडीचा रस पितात.

पण असे केल्याने तुम्हाला अन्न आणि कोरफडीच्या रसातून पोषक तत्त्वे मिळू शकत नाहीत. इतकंच नाही तर पचनाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. कोरफडीचा रस रिकाम्या पोटी घेण्याचा प्रयत्न करा. जेवण करण्यापूर्वी किमान 30 मिनिटे कोरफडाचा रस पिऊ शकता.

aloe vera juice
Papaya For Skin : चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी फायदेशीर आहे पपई, जाणून घ्या ‘हे’ फेसपॅक्स

कोरफडीचा रस आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो, परंतु प्रत्येकाला त्याचा फायदा होत नाही. खासकरून, जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल आणि तुम्ही आधीच औषध घेत असाल, तर तुम्हाला कोरफडीचा रस प्यायला त्रास होऊ शकतो.

उदाहरणार्थ, जर तुम्ही मधुमेहाचे औषध किंवा कोणत्याही प्रकारचे लैक्सेटिव मेडिसिन घेत असाल तर कोरफडीच्या रसाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. म्हणून, अशा कोणत्याही स्थितीत, प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com