Health Care News: फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं

काही योगासनं तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच करू शकता.
Health Care News: फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं

सध्याच्या काळात फिटनेसला विशेष महत्त्व दिलं जातं. हृदयविकार, डायबेटीससारखे विकार होऊ नयेत, हे विकार झाले असतील तर ते नियंत्रणात राहावेत, लठ्ठपणा कमी व्हावा या उद्देशानं व्यायाम आणि योग्य आहारावर भर दिला जातो. 

सर्वसाधारणपणे योगासने एखाद्या विशिष्ट ठिकाणीच करावीत असा समज असतो. पण हे काही प्रकार आहेत जे तुम्ही सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बेडवरच करू शकतात.

सध्याच्या काळात फिटनेसला विशेष महत्व आहे. हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजार व्यायामाच्या अभावाने होतात. त्यामुळे आहारावर नियंत्रण व सोपे व्यायाम प्रकार यामुळे त्यावर मात करता येते. मात्र जीममध्ये जाऊन व्यायाम करणे, विशिष्ट ठिकाणीच योगासने करणे याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे व्यायामच टाळला जातो.

मात्र आम्ही येथे तुम्हाला झोपेतून उठल्याबरोबर बेडवरच करता यातील अशा काही सोप्या आसनांची माहिती देणार आहोत.

Health Care News: फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं
Health Care News: दररोज सकाळी प्या हे हेल्दी ड्रिंक्स आणि शरीर ठेवा निरोगी; जाणून घ्या हा सर्वोत्तम उपाय

बेडवर केल्या जाणाऱ्या योगासनांमध्ये ब्रीदींग आणि स्ट्रेचिंग यांचा समामेश होतो. बॅलन्स योगा बेडवर करणे अवघड असते. पण योगासनांचे काही प्रकार बेडवर सहजपणे करता येतात.

वज्रासन

हे सोपे आणि बेडवर करता येणारे आसन आहे. हे आसन करण्यासाठी बेडवर पाय दुमडून बसा. तुमचे नितंब पायांच्या टाचांवर टेकवा आणि हाताची बोट जमिनीवर सपाट ठेवा. पाठ ताठ ठेवा. तुमचे हात गुडघ्यासमोर ठेऊन समोर पहा. तुमचे पाय दुखू लागेपर्यंत या आसनात बसा. हे आसन केल्याने हाडे, स्नायू मजवूत होतात, पचनशक्ती सुधारते.

बलासन

हे देखिल खूप सोपे आसन आहे. हे आसन करण्यासाठी बेडवर पाय दुमडून बसा. आपले हात समोर पसरून डोक खाली वाकवून बेडवर ठेवा. तुमच डोकं दोन्ही हातांच्या मधोमध आहे ना हे पहा. शरीर या पोझिशनमध्ये काही वेळ ठेवून मग सरळ व्हा. हे आसन केल्याने शरीराला आरामदायी वाटेल. या आसनामुळे तणाव दूर होतो, तसेच शरीर ताणलं गेल्याने लवचीक होतं.

नौकासन

हे आसन केल्याने कमरेचा आकार नॉरमल होतो. वजन कमी होते. पोटाचा घेर कमी होतो. पचनक्रिया चांगली राहते. हे आसन करण्यासाठी बेडवर पाय सरळ ठेवून बसा. त्यानंतर दोन्ही पाय एकाचवेळी वर करा. आणि पायाची बोटं एकाच रेषेत ठेवा. यामुळे तुमची पाठ थोडी मागे वाकली जाईल.

काही वेळ या पोझिशनमध्ये बसा. ही आसनं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे वजन कमी होऊन शरीर लवचीक बनते. पचनक्रिया चांगली राहते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com