Snoring side effects: घोरणाऱ्या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका, जाणून घ्या

तुम्हाला झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Snoring
Snoringsakal

झोपेत घोरण्याची सवय लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या नाराजीचाच बळी बनवू शकत नाही, तर त्याचे तुमच्या आरोग्यावर इतर दुष्परिणामही होऊ शकतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) हे देखील घोरण्याचे कारण असू शकते.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, 'ओएसए'ने त्रस्त असलेल्या लोकांना घशाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

संशोधकांच्या मते, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया हा सामान्य झोपेदरम्यान श्वास घेण्याशी संबंधित विकार आहे. यामुळे झोपेच्या दरम्यान अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टमध्ये श्वसनक्रिया बंद पडते. या लक्षणाने प्रभावित लोकांना झोप येते.

स्पेनमधील बार्सिलोना येथील युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी (ERS) येथे सादर केलेल्या एका मोठ्या अभ्यासानुसार, जे लोक जास्त वजनाचे आहेत, मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि धुम्रपान करतात आणि अल्कोहोलचे सेवन करतात त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा सर्वाधिक धोका असतो.

Snoring
Health Care News: तुम्हालाही सतत जाणवतो थकवा? मग या गोष्टी ताबडतोब खाणे बंद करा

रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते

संशोधकांनी सांगितले की आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा संबंध वृद्धांमधील ताकद कमी होण्याशी देखील होता. विशेषतः ही घट 74 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून आली आहे.

संशोधकांनी सांगितले की, तिसर्‍या अभ्यासात असे आढळून आले की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाने पीडित लोकांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. दीर्घकाळ श्वास रोखून ठेवल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, कार्डियाक अरेस्ट आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.

संशोधकांनी सांगितले की, OSA ग्रस्त लोकांवर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्यातील कर्करोगाची कारणेही शोधून काढली पाहिजेत. कारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे कॅन्सर होऊ शकतो, याचे स्पष्ट पुरावे अभ्यासाच्या निष्कर्षात मिळाले आहेत. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना जीवही गमवावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com