Immunity Booster Foods: हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती राहील मजबूत; या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची जाणून घ्या!
Immunity Booster
Immunity Boostersakal

हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येकाच्या पौष्टिक गरजा ऋतूनुसार बदलतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या शरीराला योग्य पोषण देणे अत्यंत आवश्यक आहे.  पण या ऋतूत आजारांचा धोका जास्त असतो. सर्दी-खोकल्यासारख्या समस्या रोजच होत असतात.

किंबहुना ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते ते या ऋतूत आजारी पडतात. तुमची प्रतिकारशक्तीही कमकुवत असेल आणि तुम्‍हाला आजारांपासून वाचवायचे असेल, तर तुम्‍ही तुमच्‍या आहारात काही रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या फळांचा समावेश करू शकता.

संत्री

हिवाळ्यात तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका खूप कमी होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे मौसमी आजारांना दूर ठेवतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासून तुमचे रक्षण करतात.

Immunity Booster
Skin Care: तांदळाच्या पाण्याचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा; क्लिन्झरपासून टोनरपर्यंत होतो याचा वापर!

किवी

किवीचे सेवन देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यात व्हिटॅमिन सी सारखे अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. हे पोषक घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात, आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून सुरक्षित ठेवतात.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि फायबर मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे आपल्याला संसर्गजन्य रोगांशी लढण्याची ताकद मिळते.

पेरू

हिवाळ्यात पेरूची चव चाखता येते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त त्यात फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम देखील असते. अ‍ॅन्टीऑक्सिडंटने समृद्ध असलेला पेरू शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतो. तसेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

हळद

दाहक-विरोधी गुणधर्मांनी हळद समृद्ध आहे. कर्क्यूमिन नावाचे यामध्ये तत्व असते. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर दूधामध्ये हळद मिक्स करून देखील पिऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com