Winter Session : महिलांना लवकर थंडी वाजते की पुरुषांना ? नक्की खरं काय ?

महिलांची चयापचय क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते, ज्यामुळे थंड हवामानात उष्णता निर्माण करण्याची क्षमता कमी होते.
Health
Healthgoogle

मुंबई : हिवाळा आला आहे आता सगळ्यांनीच आपल्या उबदार ब्लँकेटचा वापर सुरू केला असेल. बऱ्याचशा ऑफिसमध्ये ऑफिस टेंम्परेचर किती ठेवावं यावरून ऑफिसच्या कलिग्ज मध्ये वाद होणे सामान्य आहे.

महिलांना जास्त थंडी वाजते की पुरुषांना?

जवळजवळ समान वजन असूनही, स्त्रियांच्या शरीरात पुरुषांपेक्षा उष्णता निर्माण करणारे स्नायू कमी असतात. शास्त्रानुसार, महिलांच्या शरीरात जास्त चरबी असते, त्यांच्या त्वचेला थंडावा जाणवण्याचे हे एक कारण आहे, कारण चरबीमुळे त्वचा रक्तवाहिन्यांपासून थोडी दूर असते. महिलांची चयापचय क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते, ज्यामुळे थंड हवामानात उष्णता निर्माण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे महिलांना तुलनेने जास्त थंडी जाणवते.

हार्मोन्समुळे देखील होऊ शकते

महिलांमध्ये आढळणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स शरीराच्या आणि त्वचेच्या तापमानाच्या संदर्भात खूप महत्त्वाचे आहेत. एस्ट्रोजेन हार्मोन्समुळे रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि प्रोजेस्टेरॉनमुळे त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याचा सरळ अर्थ असा आहे की अंतर्गत अवयवांना उबदार ठेवण्यासाठी काही भागांमध्ये कमी रक्त वाहते, ज्यामुळे महिलांना थंड वाटते. मासिक पाळीच्या हार्मोन्सचे संतुलन संपूर्ण महिन्यात बदलते. त्यामुळे महिलांचे हात, पाय आणि कान पुरुषांपेक्षा तीन अंश सेल्सिअस जास्त थंड असतात.

महिलांना उबदार वातावरण आवडते

ओव्हुलेशन अर्थात मासिक पाळीच्या नंतरच्या आठवड्यात, शरीराच्या अंतर्गत अवयवांचे तापमान सर्वात जास्त असते, कारण या काळात प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी सतत वाढत असते. तथापि, स्त्रियांच्या शरीराचे सरासरी तापमान पुरुषांपेक्षा जास्त असते. पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या अनेक प्रजातींवरील अनेक अभ्यासानुसार, नर सामान्यतः थंड भागात राहणे पसंत करतात, तर मादी उबदार वातावरण निवडतात. उदाहरणार्थ, नर वटवाघुळ उंच पर्वत शिखरांवर (थंड भाग) विश्रांती घेतात, तर मादी वटवाघुळ उबदार खोऱ्यात राहणे पसंत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com