Pregnancy and Almonds : प्रेग्नंसीमध्ये कच्चे बदाम खावेत का?

प्रेग्नंट स्त्रियांना कच्चे बदाम खाणं योग्य आहे का?
Pregnancy and Almonds : प्रेग्नंसीमध्ये कच्चे बदाम खावेत का?

गरोदरपणा स्त्रिया जो आहार घेत असतात त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे प्रेग्नंसीमध्ये स्त्रियांना कायमच सकस व पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यात खासकरुन पालेभाज्या, सुकामेवा, दूध यांचा आहारात समावेश केला जातो. विशेष म्हणजे गरोदरपणा भिजवलेले बदाम खाल्ले तर बाळावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो असं म्हटलं जातं. मात्र, अनेक स्त्रियांमध्ये बदाम खाण्याविषयी काही समज-गैरसमज आहेत. म्हणूनच, गरोदरपणा बदाम खावेत कि खाऊ नये याविषयी आज जाणून घेऊयात. (health-news-eating-almonds-during-pregnancy-is-right-know-this-thing-ssj93)

Parenting Firstcry नुसार, गरोदरपणा स्त्रियांनी कच्चे बदाम खाल्ले तर बाळाच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. कच्च्या बदामामध्ये आयरन, कॅल्शिअम, फॉलिक अॅसिड, फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कच्चे बदाम खाणे फायद्याचं आहे. मात्र, जर स्त्रियांना बदाम किंवा अन्य सुकामेव्यातील पदार्थांची अॅलर्जी असेल तर त्यांनी हे पदार्थ खाऊ नये.

Pregnancy and Almonds : प्रेग्नंसीमध्ये कच्चे बदाम खावेत का?
पिरीअड मिस झाल्यावरही प्रेग्नंसी टेस्ट निगेटिव्ह येतीये?

गरोदरपणात बदाम का खावेत?

रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे त्यातून फायटिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत मिळते आणि त्यातील फॉस्फरस रिलीज होतो. ज्यामुळे हाडे बळकट होतात व पचनक्रियादेखील सुधारते.

मीठाच्या पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे एंजाइम रोखणारे तत्व नष्ट होता. व एंजाइम्स रिलीज होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com