esakal | कोरोना काळात ठेवा पॉझिटिव्ह विचार; जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात ठेवा पॉझिटिव्ह विचार; जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल

कोरोना काळात ठेवा पॉझिटिव्ह विचार; जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाचं (Covid-19) संकट टाळायचं असेल तर प्रत्येकाने घरात राहून स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातच नागरिक नियमांचं पालन करत नसल्यामुळे प्रशासनाला सक्तीने वागावं लागत आहे. यातच अनेक ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक जण घरात अडकून पडला आहे. मात्र, या काळात अनेक जण मानसिक समस्येला सामोरं जात आहेत. सतत घरात कोंडून राहिल्यामुळे अनेक जणांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण झाली आहे. परिणामी, अनेक जण नैराश्यात जात असल्याचं पाहायला मिळत आहेत. म्हणूनच लॉकडाउनच्या काळात आनंदी राहण्यासाठी व नैराश्यावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील ते पाहुयात. (health-news-keep-yourself-controlled-by-these-six-ways-in-the-corona-period-overcome-fear-in-this-way)

१. समस्येचं मूळ शोधा -

अनेकदा नैराश्य आल्यामुळे व्यक्तीची चिडचिड वाढते. उगाच लहान लहान कारणावरुन राग येणे, एखाद्याशी वाद घालणे असे स्वभावात बदल होतात. परंतु, हे असं नेमकं का होतंय त्यामागाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या चिडण्यामागचं कारण समजल्यानंतर या समस्येवर आपोआप मात करता येऊ शकते. त्यामुळे रागावण्यापेक्षा समस्येच्या मूळापर्यंत जा.

२. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा -

सध्याच्या काळात घडत असलेल्या घटना पाहून आपोआप एक प्रकारची नकारात्मकता व्यक्तीमध्ये येऊ शकते. त्यामुळे आजुबाजूच्या वातावरणातील सकारात्मक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार करणाऱ्यांपासून स्वत:पासून दूर ठेवा. सतत एकाच गोष्टीचा विचार करु नका. भरपूर वाचन करा, गाणी ऐका. विविध कामांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवा.

३. इतरांच्या भावनांचा आदर करा -

सध्याच्या काळात कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरातच असल्यामुळे एकमेकांशी संवाद साधा. एकमेकांचे विचार जाणून घ्या. सोबतच समोरची व्यक्ती काही सांगत असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करा.

४. प्रेम व्यक्त करा -

आपल्या प्रियजनांविषयी असलेलं प्रेम व्यक्त करा. घरातील लहान, मोठे सगळ्यांसोबत बसून गप्पा मारा. या कठीण प्रसंगात एकमेकांसोबत बोलणं याच्याहून उत्तम औषध कोणतंच नाही.

५. सकारात्मक विचार ठेवा -

आपल्या आजुबाजुला कितीही नकारात्मक वातावरण निर्माण होत असलं तरीदेखील सकारात्मक राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. कोणीही तुमच्याजवळ नकारात्मक विचार मांडत असेल. तर, तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारांवर अडून रहा आणि समोरच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करा.