esakal | सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं ठरू शकतं धोक्याचं
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं ठरू शकतं धोक्याचं

सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं ठरू शकतं धोक्याचं

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आजच्या काळात मोबाईल फोन जवळ असणं गरजेचं झालं आहे. परंतु, काहीजण या फोनचा अतिरिक्त वापर करतात. कुठेही जातांना मोबाईल त्यांच्या जवळच असतो. यात काहीजण टॉयलेटला जातांनादेखील फोन सोबतच घेऊन जातात. जर तुम्हीसुद्धा असंच करत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण, टॉयलेटला जाताना मोबाईल सोबत नेणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर केल्यास अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. (health-tips-do-not-use-mobile-phone-while-sitting-on-the-commode)

सध्याच्या काळात पारंपरिक शौचालयांऐवजी पाश्चात्य पद्धतीचं शौचालय वापरण्याकडे नागरिकांचा कल अधिक असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, या पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयामध्ये अनेकजण टाईमपास म्हणून मोबाईल फोन किंवा वाचनासाठी पेपर वगैरे घेऊन जातात. परिणामी, बराच वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळत आहे.

हेही वाचा: गाय-वासराला पाणीपुरीची भुरळ; पाहा भन्नाट व्हिडीओ

अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, आज जवळपास ५७ टक्के लोक पाईल्स म्हणजेच मूळव्याधाच्या त्रासाने त्रस्त आहेत. चुकीची आहार पद्धती आणि शौचास गेल्यावर बराच काळ बसून राहणे हे त्यामागील मूळ आणि तितकंच गंभीर कारण आहे. डॉक्टरांच्या मते, अनेकजण टॉयलेटमध्ये गेल्यावर फोनवर टाईमपास करत बसतात. त्यामुळे त्यांना वेळेचा अंदाज येत नाही. परिणामी, एकाच स्थिती बसल्यामुळे अशा व्यक्तींना पाईल्स किंवा हॅमरायड्स होण्याची शक्यता असते.

दरम्यान, टॉयलेटमध्ये एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे एनस आणि लोअर रेक्टम या मांसपेशींवर ताण येतो. ज्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे पाईल्स किंवा हॅमरायड्सचा त्रास सुरू झाल्यास व्यक्तीच्या शौचाच्या जागेतून रक्तस्राव होण्याचीही शक्यता असते.