
Health Tips : उन्हाळ्यात ताक जास्त पिण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या
निरोगी राहण्यासाठी अनेक लोक रोजच्या आहारात दुधाचे सेवन करतात. तर पोषक तत्वांनी समृद्ध दूध हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. पण तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहिती आहेत का? उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून दूर रहायचे असेल तर ताक पिण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.
ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट असे घटक मुबलक प्रमाणात असतात. दररोज एक ग्लास बटर मिल्कचे सेवन करून तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. ताक पिल्याने नक्की काय फायदे आहेत हे पाहुयात.
- थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. तर, ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नेमाने वाटीभर ताक पिणे उत्तम आहे.
- अपचन होणे, किंवा पोटात जडपणा वाटणे, यासारखी लक्षणे असल्यास आल्याचा रस, पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ ताकात मिक्स करून प्यावे.
- उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशावेळी उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.

ताक पिण्याचे फायदे
- जास्त तेल-मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उन्हाळ्यात लोकांची पचनक्रिया बिघडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.
- प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए सारख्या गुणधर्मांनी समृद्ध ताक देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज एक ग्लास ताकाचे सेवण करावे.
- वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे काढे, ज्यूस घेत असाल तर तूमच्या डायटमध्ये ताकाचाही समावेश करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज ताक प्यायल्याने तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. ताकामध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामूळे वजन झटक्यात कमी होतं.