Fitness साठी जीममध्ये पैसे भरण्याएवजी ‘या’ Activityने रहा फिट ते ही फुकटात!

जिम किंवा एखाद्या फिटनेस स्टुडिओत जाऊन एक्सरसाइज करणं हा फिटनेससाठीच पर्याय नाही. आज आम्ही तुम्हाला एक्सरसाईजचा एक असा पर्याय सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला पैसे मोजण्याची आवश्यकता भसणार नाही.
home workout tips
home workout tipsEsakal

फिटनेससाठी एक्सरसाइज Exercise अत्यंत गरजेचे आहेत, हे अनेकांना ठाऊक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम केला तर फिट राहून आरोग्याच्या तक्रारींपासून सुटका मिळते. यासाठीच अलिकडे अनेकजण फिट राहण्यासाठी जिमला Gym जाण्याचा पर्याय निवडतात.

गेल्या काही वर्षात जिमसोबतच वर्कआउटसाठीचे वेगवेळे ट्रेंड आल्याचं आपण पाहतोय. Health Tips in Marathi Tray physical activities instead of Gym Exercise

झुंबा, पिलेट्स, बॅले बॅरे वर्क आउट. हायइंटेंसिटी वर्क आऊट असे अनेक ट्रेंड सुरू झाले. यासाठी वेगवेगळे फिटनेस स्टुडिओ Fitness किंवा ऑनलाईन क्लासेसही उपलब्ध आहेत.

आपल्यापैकी अनेक जण फिटनेससाठी अशा वेगवेगळ्या क्लासेसला प्रवेश घेतात. या फिटनेस स्टिडिओ किंवा जिमची Gym फी देखील चांगलीच मोठी असते.

ट्रेंडमध्ये असलेल्या अनेक एक्सरसाईज क्लासेससाठी भली मोठी फी भरून ही अनेकदा नियमित या व्यायामांसाठी वेळ देणं अनेकांना शक्य होत नाही. खरं तर जिम किंवा एखाद्या फिटनेस स्टुडिओत जाऊन एक्सरसाइज करणं हा फिटनेससाठीच पर्याय नाही.

आज आम्ही तुम्हाला एक्सरसाईजचा एक असा पर्याय सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला पैसे मोजण्याची आवश्यकता भसणार नाही.

अनेकदा केवळ पैसे भरले आहेत म्हणून अनेकजण जिममध्ये जातता. तर काही वजन कमी करायचंय म्हणून इच्छा शक्ती आणि वेळ तसचं अंगात ताकद नसतानाही जिममध्ये घाम गाळत बसतात. त्याएवजी तुम्ही एक्सरसाइज एक असा पर्याय निवडू शकता जिथे तुम्हाला पैसे भरण्याची गरज नाही.

तुमच्या कॅलरीजही बर्न होतील आणि तुम्हाला आनंद आणि मानसिक शांती देखील मिळेल. ही एक्टिव्हिटी म्हणजे गार्डनिंग. अमेरिकेत सध्या अनेकजण गार्डनिंग म्हणजेच बागकामाकडे वर्कआऊट आणि फिटनेसचा एक नवा पर्याय म्हणून पाहू लागले आहेत.

एका संशोधनानुसार आपल्या बागेत किंवा परसबागेत काम केल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत मिळते. अमेरिकेतील यूएस फिजिकल अॅक्टिविटी गाइडलाइंसनुसार रिकाम्या वेळेत केलं जाणारं कामदेखील एक शरीर बळकट करण्यासाठीची योग्य अॅक्टिविटी आहे. शिवाय यात दुखापत होण्याचा धोका देखील कमी असतो.

हे देखिल वाचा-

home workout tips
Fitness Personality Test : तुम्हालाही व्यायामाची आवड आहे? तुमची हिच आवड सांगते स्वभाव, जाणून घ्या

गार्डनिंग वर्कआउट

अभ्यासानुसार आठवड्यातून केवळ २ तास बागेमध्ये फेरफटका मारल्याने तुमचा मूड चांगला राहू शकतो. शिवाय ग्रुपमध्ये एकत्र येऊन बागकाम केल्याने ताण कमी होतो आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो.

यासाठीच आता अमेरिकेतील अनेक लोक त्यांच्या ट्रेनरला बागकाम आणि लॅण्डस्केप अॅक्टिविटीला त्यांच्या रोजच्या वर्कआउट रुटीनमध्ये सामील करण्यास सांगत आहेत.

अनेक ट्रेनर गार्डनिंगला या वर्षाचा वर्कआउट ट्रेंड मानत आहेत. त्यांच्या मते हे लोकांसाठी खूपच सोप असल्याने कुणालाही बागकाम करणं सहज शक्य आहे.

बागकामाने कॅलरी होतील बर्न

काही तज्ञांच्या मते गार्डनिंग म्हणजेच बागकामाचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरातील सुस्तपणा निघून जाण्यास मदत होते आणि चपळाई येते. तसचं सहनशक्ती वाढण्यास मदत होते.

बागकाम करताना खड्डे खोदणं, नवीन रोपं लावणं तसचं गवताची छाटणी करणं यासारख्या अनेक एक्टिविटींमुळे शरीराची चांगली हालचाल होते. यामुळे स्नायू मजबूत होतात.

तसंच शरीर सक्रिय राहिल्याने रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते. युएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ऍण्ड प्रिवेंशनच्या माहितीनुसार गार्डनिंग करताना 70 किलो वजन असलेल्या व्यक्तीच्या जवळपास ३३० कॅलरी बर्न होतात.

शिवाय जिममध्ये वर्कआऊट करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करणं गरडेचं असतं. मात्र बागकामात असं काही करण्याची आवश्यकता भासत नाही. बागकाम सुरु करण्यापूर्वी बागेला एक फेरफटका मारणं म्हणजेच वाॅर्मअप होईल. 

तणाव दूर होईल

बागकाम केल्याने फिटनेस सोबतच मानसिक आरोग्य चांगलं राहतं. एका अभ्यासानुसार बागकाम करणारे हे इतर बागकाम न करणाऱ्यांपेक्षा कमी तणावात असल्याचं निदर्शनास आलं आहे.

बागकाम करणाऱ्या लोकांमध्ये कार्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी असल्याचं निदर्शनास आलं. ज्यामुळे ते कमी तणावात होते.  बागकाम करणाऱ्यांचं डोकं शांत राहतं आणि रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली होते. 

स्मरणशक्ती वाढते

बागकामामुळे स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते. ३ हजार प्रौढांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की बागकाम करणाऱ्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका इतरांच्या तुलनेत ३६ टक्के कमी असतो.

बागकामा दरम्यान केल्या जाणाऱ्या कामांमुळे मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते. यामुळेच मेंदूची आणि स्मरणशक्तीच्या क्षमतेत वाढ होते. 

यामुळेच जर  तुम्ही फिटनेसचा विचार करत असाल तर कोणतेही पैसे न मोजता करण्यासारखा वर्कआउट म्हणजे गार्डनिंग तुम्ही नक्कीच करू शकता. यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही फिट व्हाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com