const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीराला धोका; खेळाडूंना डॉक्टरांचा सल्ला

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीरातील अवयवांना धोका होण्याची शक्यता जास्त असते.
Healthy Diet:
Healthy Diet:Sakal

शरीरसौष्ठव व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रथिने आवश्यक असतात. मात्र, ‘पावडर प्रथिनां’पेक्षा आहारातून मिळालेली प्रथिनेच महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीरातील अवयवांना धोका होण्याची शक्यता जास्त असते. शरीराची हालचाल, खर्च होणारी ऊर्जा यावर आहारातील प्रथिनांचे अथवा पावडर प्रथिनांचे प्रमाण ठरवणे आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

शरीराची कोणतीच हालचाल नसणे अथवा शरीराची ऊर्जा खर्च न होणे अशा व्यक्तींनी ‘पावडर प्रथिने’ अथवा आहारातून जास्त प्रमाणात प्रथिने सेवन केल्यानेदेखील धोका उद्‍भवू शकतो. आहारातून फळभाज्या, कडधान्ये यांच्या माध्यमातून प्रथिने मिळतात. त्याचप्रमाणे ‘पावडर प्रथिने’ हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक असते. याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकार, रक्तवाहिन्या किडनी, लिव्हरवर परिणाम होतो.

ही काळजी घेण्याची गरज

तूप, ऑलिव्ह ऑइल, स्वयंपाकाचे कोकोनट ऑइल, नैसर्गिक चीज, बटर कमी.

ड्राय फ्रूट्स - बदाम- काजू- अंजीर यांसारखी प्रथिनयुक्त ड्रायफ्रूट्स घ्यावेत.

४५ मिनिटास व्यायामाप्रमाणे प्रथिने शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

प्रथिने स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सना वाढविण्याचे काम करतात.

शारीरिक आराम, समतोल आहार आणि व्यायाम हे त्रिकुट व्यवस्थित साधणे महत्त्वाचे.

शरीराला १ किलोग्रॅममागे एक ग्रॅम बॉडीवेट इतक्या प्रमाणात प्रथिने लागतात.

फॅट्स हे २० टक्क्यांप्रमाणे शरीराला गरजेचे आहेत.

Healthy Diet:
Healthy Tips: माठातील पाणी आरोग्यदायी, खाली बसून घोट घोट पाणी पिणे सर्वोत्तम

शरीरसौष्ठव व खेळाडूंना सराव अथवा स्पर्धेमध्ये शरीराची ऊर्जा जास्त खर्च होत असते. ती भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. मानवी जीवनात पावडर प्रोटीनचा अतिरेक शरीराला धोकादायक ठरू शकतो. त्या अनुषंगाने आहारातील प्रोटीन महत्त्वाचे व आवश्यक आहे; तसेच पावडर प्रोटीन अथवा आहारातील प्रोटीन किती प्रमाणात घ्यावे, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे.

— दीपक रुईकर, जिम प्रशिक्षक

कृत्रिम प्रोटीन सप्लिमेंट्सच्या अतिसेवनामुळे किडनी आणि लिव्हरचे आजार उद्‍भवण्याची शक्यता असते. तसेच किडनी निकामी होण्याची शक्यता असते. यामुळे नैसर्गिक अन्न सेवन करणे हाच एक उत्तम उपाय असून चिकन, मटण, मासे, अंडी त्याचप्रमाणे पनीर, उसळ, कडधान्य, ब्रोकोली, सोयाबीन, भाकरी (ज्वारी, नाचणी, बाजरी), ओट्स, सगळी फळे यातून शरीराला योग्य ते प्रोटीन मिळण्यास मदत होते.

- डॉ. सुनील देशमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com