Healthy Soup Recipe : बनवायला अवघड वाटणाऱ्या सूपची सोप्पी रेसिपी, लगेचच नोट करून घ्या

हिवाळ्यात मुलांचे आरोग्य अन् वेगळी चव या दोन्ही गोष्टी या रेसिपीमध्ये मिळतील
Healthy Soup Recipe
Healthy Soup Recipe esakal

Healthy Soup Recipe :

काहीवेळा स्टार्टर म्हणून दिले जाणारे सूप घरी बनवणे सोपे आहे का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अगदी तशाच दिसणारे सूप घरीही बनवता येतात. त्यांची रेसिपीही सोपी आहे. सूपची रेसिपी संपूर्ण जगभरात बनवले जाते.

हे सहसा भूक कमी करण्यासाठी प्रथम कोर्स/स्टार्टर म्हणून दिले जाते, परंतु इतर आरोग्य कारणांसाठी देखील वापरले जाऊ शकते. अशीच एक सोपी आणि प्रसिद्ध निरोगी सूप रेसिपी म्हणजे व्हेजिटेबल सूप रेसिपी होय. जी त्यातील पोषक घटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आपण आज पाहणाऱ्या सूपच्या रेसिपी उमाशशी भालेराव यांनी सांगितलेल्या आहेत.

Healthy Soup Recipe
Butter Garlic Chicken Recipe : न्यू इयर पार्टीसाठी काय बनवायचंय सुचत नाही? ट्राय करा टेस्टी बटर गार्लिक चिकन

हॉट ॲण्ड सोअर सूप

साहित्य

अर्धा कप लांब चिरलेला कोबी, अर्धा कप किसलेले गाजर, अर्धा कप बारीक चिरलेला कॉलीप्लॉवर, पातीच्या कांद्याचे ४ कांदे बारीक चिरून, २ चमचे व्हिनेगर, १ चमचा सोया सॉस, अर्धा चमचा चिली सॉस, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, २ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, २ चमचे तेल, मीठ, मिरपूड.

कृती

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेले कोबी, गाजर, फ्लॉवर, कांदा सर्व घालून मोठ्या विस्तवावर २-३ मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात चार कप पाणी, व्हिनेगर, सोया सॉस, चिली सॉस, कोथिंबीर, मीठ, मिरपूड सर्व घालून ढवळून घ्यावे. थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर कालवून त्यात घालावे. सतत ढवळत ३-४ मिनिटे उकळू द्यावे. गरमागरम सर्व्ह करावे.

Healthy Soup Recipe
Healthy Breakfast Recipe : हिवाळ्यात नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पुरी, एकदम सोपी आहे रेसिपी

स्वीट कॉर्न सूप

साहित्य

एका स्वीट कॉर्नचे दाणे सोलून थोडे ठेचून, १ स्वीट कॉर्न किसून, २-३ चमचे कॉर्नफ्लोअर, चमचाभर सोया सॉस, चमचाभर चिली सॉस, चवीनुसार मीठ व साखर.

कृती

चार कप पाण्यात मक्याचे दाणे घालून शिजवून घ्यावे. दुसरीकडे थोड्या थंड पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून घ्यावे व हे मिश्रण शिजत असलेल्या मक्याच्या दाण्यात घालावे. नीट ढवळत मिनिटभर शिजू द्यावे.

नंतर त्यात किसलेले स्वीट कॉर्न घालून पुन्हा पाच मिनिटे शिजवावे. त्यात सोया सॉस, चिली सॉस व आवडीप्रमाणे मीठ, साखर घालून सर्व्ह करावे. स्वीट कॉर्न सूपमध्ये काहीवेळा बारीक चिरलेल्या भाज्याही शिजवून घालतात.

Healthy Soup Recipe
Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी बटाटा ब्रेड बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

नूडल सूप

साहित्य

अर्धा कप शिजवलेले हक्का नूडल (कात्रीने एकाचे दोन तुकडे करून घ्यावेत), फ्लॉवर, गाजर बारीक चिरून, ४-५ पातीचे कोवळे कांदे बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, २ लेट्युसची पाने बारीक चिरून, २ चमचे तेल, मीठ व मिरपूड.

कृती

तेल तापवून त्यात सर्व चिरलेल्या भाज्या व कांदा घालून मोठ्या आचेवर ३-४ मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात ४ कप पाणी, चिरलेला टोमॅटो, लेट्युस, मीठ, मिरपूड घालून उकळावे. शेवटी त्यात शिजवलेले नूडल घालून गॅस बंद करावा.

सर्व्ह करताना सूपमध्ये आवडीप्रमाणे सोया सॉस, चिली सॉस घालावा. व्हिनेगरमध्ये मुरवलेल्या मिरचीचे थोडे तुकडे घालावेत. सजावटीसाठी थोडे नूडल तळून वरती घालावेत.

टीप ः हे सूप पातळच असते, पण थोडा घट्टपणा हवा असल्यास २ चमचे कॉर्नफ्लोअर थंड पाण्यात घालून सूपमध्ये मिसळून सूप उकळावे.

Healthy Soup Recipe
Oats Recipe : हिवाळ्यात ओट्स खाण्याचे अनेक फायदे, ब्रेकफास्टला या रेसिपी नक्की ट्राय करा

फ्रेंच ओनियन सूप

साहित्य

दोन मोठे कांदे, २ चमचे बटर, ४ चमचे मैदा, मीठ व मिरपूड.

कृती

कांदे पातळ लांब लांब चिरावेत. बटर गरम करून त्यात चिरलेले कांदे ब्राऊन होईपर्यंत परतावेत. त्यावर मैदा भुरभुरून पुन्हा परतावे. काळपट ब्राऊन झाल्यावर त्यावर ४ कप पाणी घालून उकळावे. मीठ व मिरपूड घालून सर्व्ह करावे. हे सूप पाण्यासारखे पातळ असते पण चविष्ट लागते.

Healthy Soup Recipe
Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी गाजर पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

इटालियन मॅकरोनी सूप

 साहित्य

दोन चमचे ऑलिव्ह ऑइल (नसल्यास रिफाइंड ऑइल चालेल), १ शिजवलेली मॅकरोनी, १ लहान कांदा बारीक चिरून, २ चमचे मैदा, ४ कप दूध, मीठ, मिरपूड, थोडे किसलेले चीज.

कृती

मॅकरोनी भरपूर पाण्यात घालून शिजवून घ्यावी. शिजल्यावर थंड पाण्यात घालून ठेवावी म्हणजे चिकट होणार नाही. दुसरीकडे ऑलिव्ह ऑइल अथवा रिफाइंड ऑइल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. नंतर २ चमचे मैदा घालून परतून घ्यावे.

नंतर हळूहळू दूध गाळून सतत ढवळत राहावे. गाठी होऊ देऊ नयेत. छान पातळसर व्हाइट सॉस तयार होईल. चवीप्रमाणे मीठ, मिरपूड व किसलेले चीज घालावे. शेवटी शिजवलेली मॅकरोनी घालावी व गरमगरम सर्व्ह करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com