अंगणात हळदीचा कार्यक्रम जोरदार सुरू होता. पहिल्यांदाच डीजेवर गाणी लावून आम्ही सगळे नाचत होतो. एका बाजूला चाटचं काउंटर सुरूच होतं. दुसऱ्या कोपऱ्यात बाबा आणि काका सेल्फी कॅार्नरचे कटआउट तयार करत होते. सगळं अगदी चित्रपटात दाखवतात अगदी तस्सं! धाकट्या बहिणीचे डोळे मध्येच पाणावत होते, तर दुसऱ्या क्षणी ती खुदकन हसत होती.