Skin Care: उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडल्यात? जाणून घ्या सोपे घरगुती उपाय

टाचांना भेगा पडल्यास करा हे घरगुती उपाय.
Crack Heels
Crack Heelssakal

उन्हाळ्यात तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील किंवा कोरड्या पडल्या असतील तर तुम्ही एकटे नाही आहात. या समस्येबद्दल तक्रार करणाऱ्या अनेक महिला आहेत. उन्हाळ्यात जास्त का भेगा पडतात ते कळत नाही. याशिवाय टाच देखील ड्राय होते.

जर तुम्ही तुमच्या पायाची योग्य काळजी घेत नसाल तर असे होणे साहजिक आहे, पण काळजी घेतल्यानंतरही जर तुमच्या टाचांना भेगा असतील तर काही घरगुती उपाय करून पहा.

Crack Heels
Shikakai for Hair Care: शिकेकाईचा ‘असा’ वापर कराल तर केसांच्या समस्या कायमच्या विसराल

तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या मोहरीचे तेल वापरायचे आहे. मोहरीचे तेल तुमच्या तडतडलेल्या पायांना सखोलपणे पोषण देईल त्यामुळे उन्हाळ्यात तुमचे पाय मऊ होतील. व्हिटॅमिन-ई समृद्ध मोहरीचे तेल त्वचेला आतून हायड्रेट करते. हे तुम्हाला तुमच्या टाचांमधील क्रॅक भरण्यास मदत करू शकते.

मोहरीचे तेल आणि कच्ची हळद लावा

हळद त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखली जाते जी वेदना कमी करण्यास मदत करू शकते. त्याचे अँटीसेप्टिक गुणधर्म जखमा भरण्यास मदत करतात. जर तुम्हालाही तुमच्या घोट्यात दुखत असेल तर मोहरीचे तेल आणि हळद तुम्हाला त्यापासून आराम देऊ शकते.

Crack Heels
Fruits in Breakfast: ​नाश्त्यात चुकूनही खाऊ नका ही फळे, नाहीतर...

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून कच्ची हळद

  • अर्धा कप मोहरी तेल

असा करा वापर

  • प्रथम मोहरीचे तेल गरम करा आणि नंतर कच्ची हळद देखील गरम करा.

  • गरम तेल एका भांड्यात टाका आणि त्यात कच्ची हळद किसून घ्या. दोन्ही गोष्टी मिक्स करा.

  • ते पायावर लावून मसाज करा आणि मग मोजे घाला आणि रात्रभर सोडा.

  • सकाळी आपले पाय धुवा आणि नंतर आपल्या टाचांना कोमट मोहरीच्या तेलाने ओलावा.

देशी तूप आणि मोहरीचे तेल लावावे

देसी तूप त्वचेला मऊ बनवते आणि एक चांगला मॉइश्चरायझर आहे. तूप आणि मोहरीचे तेल हे दोन्ही तुमच्या टाचांच्या भेगा बरे करण्याचा प्रभावी मार्ग असू शकतात. भेगा पडल्यामुळे घोट्यात दुखत असेल तर तूप कमी होण्यास मदत करते.

या टिप्स तुमच्या पायाचा कोरडेपणा दूर करून भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यात मदत करू शकतात. यानंतरही आराम मिळत नसेल तर एकदा डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com