esakal | High Protein Diet : 'बॉडी' तर बनून जाईल, पण शरीर मात्रं होतं त्याचं काय?
sakal

बोलून बातमी शोधा

High Protein Diet

शरीराच्या वाढीसाठी आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनांची खूप आवश्यकता असते.

'बॉडी' तर बनून जाईल, पण शरीर मात्रं होतं त्याचं काय?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

High Protein Diet : शरीराच्या वाढीसाठी आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनांची खूप आवश्यकता असते. प्राण्यांच्या प्रथिनांमध्ये मांस, मासे, अंडी, चिकन आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो, तर वनस्पतींमध्ये बीन्स, नट आणि धान्यांचा समावेश आपल्याला पहायला मिळतो. प्रौढांसाठी दररोज आवश्यक प्रमाणात प्रथिने शरीराच्या वजनानुसार 0.8 ग्रॅम, मुलांसाठी 1.5 ग्रॅम आणि तरुणांसाठी 1.0 ग्रॅम असणं आवश्यक आहे. स्नायूंच्या बळकटीसाठी अनेक खेळाडू उच्च प्रथिनांना अधिक पसंती दर्शवितात. मात्र, काही तज्ञांच्या मतानुसार, उच्च प्रथिनेयुक्त आहार आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो.

का महत्वाचं आहे प्रोटीन : अन्नातून घेतलेल्या प्रथिनांमध्ये अमिनो अॅसिड असणं आवश्यक आहे. कारण, आपलं शरीर आपण स्वतः बनवू शकत नाही. बालपण, पौगंडावस्था, गर्भधारणा, स्तनपान आणि वृद्धावस्थेत पुरेसे प्रोटीन आपल्या शरीरात असणं गरजेचं आहे. प्रौढ झाल्यानंतर दररोज आवश्यक प्रमाणात शरीरात प्रथिनं राखणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. याचा अर्थ असा, की आपण वयानुसार कुपोषण टाळण्यासाठी पुरेसे प्रोटीन घेणे आवश्यक आहे. स्नायूंच्या ताकदीसाठी प्रोटीन महत्वाचं असून वजन कमी करणे, पचनक्रियेसाठी देखील प्रोटीन आपल्या शरीरात प्रभावी ठरु शकते.

हेही वाचा: लोक अजूनही मासिक पाळीशी संबंधित 'या' अफवांवर विश्वास ठेवतात

शरीरात प्रोटीनचं प्रमाण वाढवा : दररोज किती प्रथिनं घ्यावीत, हे स्पष्ट नाही. मात्र, पुरुषांसाठी दररोज 56 ग्रॅम आणि स्त्रियांसाठी 46 ग्रॅम प्रथिनं घेणं आवश्यक मानलं जातं. आपण कमी चरबीयुक्त ग्रीक दही, चिकन ब्रेस्ट आणि स्किम मिल्क सीरियलमधून एक वाटीतून 46 ग्रॅम प्रथिनं मिळवू शकता. वजनानुसार, 63 किलो व्यक्तीला दररोज 51 ग्रॅम प्रथिनं आवश्यक असतात. तर साधारण व्यक्तीसाठी 10 टक्के कॅलरीज प्रथिनांमधून आल्या पाहिजेत. लाल मांसाऐवजी मासे, दही आणि बीन्समधून प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करावा.

हेही वाचा: VIDEO : कोलकत्यात गोल्डनमॅन नीरजनं मटण, बंगाली थाळीवर मारला यथेच्छ ताव

जास्त प्रोटीनमुळे शरीराचं नुकसान : स्नायू, अवयव आणि हाडे यांच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी प्रथिनं आवश्यक असतात. तथापि, जास्त प्रमाणात प्रथिनं शरीरात चरबी म्हणून साठवले जातात. यामुळे लठ्ठपणाही वाढतो. तज्ञांच्या मते, कमी कार्बोहायड्रेट्ससह उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने शरीरात फायबरची कमतरता देखील जाणवते. मांस, मासे किंवा चिकनद्वारे जास्त प्रथिने घेतल्याने अतिसार होऊ शकतो. तसेच जास्त प्रथिने मूत्रपिंड आणि हृदयालाही नुकसान पोहोचवतात. म्हणून, आपल्या शरीरानुसार प्रथिनं निवडा.

डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

loading image
go to top