

Mythological story behind bhang and Holi
Sakal
Legal status of bhang in Maharashtra: मार्च महिन्यात हिंदू वर्षाचा शेवटचा आणि सर्वांचा आवडीचा सण म्हणजे होळी. या दिवशी रंग, पुरणपोळी, गुजिया याचसोबत अजून एक खास गोष्टीचे सगळे चाहते असतात, ती म्हणजे भांग. हजारो वर्षांपासून होळी आणि या भांगचा एकमेकांशी संबंध आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये भांगचा उल्लेख ‘विजय’ या नावाने आढळतो. वेदांनुसार, भांग ही पाच पवित्र वनस्पतींपैकी एक मानली जाते. मग चला, जाणून घेऊया की होळीमध्ये भांगचा उपयोग कसा सुरू झाला, ती कशी बनवतात आणि भारतात याला कायदेशीर मान्यता काय आहे.