Holi Party 2024 : 'रंग बरसे'...होळी पार्टीला जाण्याची तयारी करताय? मग, ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

Holi Party 2024 : सध्या देशात सगळीकडे होळीचा उत्साह पहायला मिळतोय. रविवारी होलिका दहन साजरे केल्यानंतर आज रंगांची होळी खेळली जात आहे.
Holi Party 2024
Holi Party 2024esakal

Holi Party 2024 : सध्या देशात सगळीकडे होळीचा उत्साह पहायला मिळतोय. रविवारी होलिका दहन साजरे केल्यानंतर आज रंगांची होळी खेळली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. होळी निमित्त अनेक ठिकाणी होळी पार्टीचे आयोजन केले जाते. अगदी ऑफिस कार्यालयापासून ते सोसायट्यांमध्ये ही होळी पार्टी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

या होळी पार्टीला जाण्यासाठी तरूणी खास तयारी करतात. होळी पार्टीसाठी ड्रेसची निवड करण्यापासून ते ज्वेलरी आणि मेकअपपर्यंतची तयारी जोरात केली जाते. अनेक तरूणी स्वत:ला व्यवस्थित स्टाईल करताना दिसतात.

जर तुम्हाला ही यंदाच्या होळी पार्टीला जायचे असेल तर, पार्टीसाठी तयार होताना काही खास गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला रंग खेळताना कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Holi Party 2024
Holi 2024 Recipies : होळी पार्टीला स्वीट कॉर्नपासून घरच्या घरी बनवा ‘हे’ चविष्ट हेल्दी स्नॅक्स, एकदम सोपी आहे रेसिपी

सूती कपड्यांची करा निवड

होळी पार्टीला जाताना सर्वात आधी सूती कपड्यांची निवड करायला प्राधान्य द्या. कारण, होळी पार्टीमध्ये पाण्याचा आणि विविध रंगांचा वापर करून होळी खेळली जाते. त्यामुळे, अशावेळी सूती कपडे परिधान करणे कधी ही चांगले.

कारण, सूती कपड्यांमध्ये पाणी लवकर सुकते. त्यामुळे, तुमच्या त्वचेला कोणताही संसर्ग होण्याचा धोका राहत नाही, आणि तुम्हाला थंडी देखील वाजत नाही. जर तुम्ही होळी पार्टीला जाताना सूती कपड्यांऐवजी इतर फॅब्रिकपासून बनवलेले कपडे परिधान केल्यास तुमचा गोंधळ उडू शकतो.

केस बांधणे आवश्यक

जर तुमचे केस लांब असतील, तर होळी पार्टीला जाताना तुमचे केस व्यवस्थित बांधा. केसांचा अंबाडा बनवा किंवा छानपैकी वेणी घाला. वेणी किंवा अंबाडा घातल्याने तुमच्या केसांचे विविध रंगांपासून संरक्षण होईल. तसेच, तुमच्या केसांना कोणतीही समस्या होणार नाही. जर तुम्हाला वेणी किंवा अंबाडा घालायचा नसेल तर तुम्ही केसांची पोनीटेलही घालू शकता.

डार्क मेकअप करू नका

होळी पार्टीला जाताना आऊटफिटच्या स्टायलिंगसोबत तुमचा मेकअप आणि हेअरस्टाईलची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो डार्क मेकअप करणे टाळा आणि लाईट मेकअप करण्यावर भर द्या. कारण, जर तुम्ही डार्क मेकअप केला आणि त्यावर पाणी उडाले तर तुमचा मेकअप खराब होऊ शकतो.

Holi Party 2024
Holi Party 2024 : रंग लावण्याऐवजी सगळे तुम्हाला पाहून हरवून जातील, होळीच्या पार्टीला फक्त ‘या’ अभिनेत्रींसारखा करा हटके लूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com