ढेकणांच्या समस्येने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

'या' उपायांमुळे नक्कीच तुमच्या घरातील ढेकणं पळून जातील
ढेकणांच्या समस्येने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर घर स्वच्छ असणंदेखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच घरात भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असणं अत्यंत गरजेचं आहे. जर, घरात अस्वच्छता, पसारा असेल तर त्या ठिकाणी रोगराई पसरते. परिणामी, अशा घरामध्ये डास, ढेकूण यांचीही पैदास होते. या किटकांसोबतच सर्वात त्रासदायक ठरणारा किटक म्हणजे ढेकूण (bugs). खासकरुन गाद्या, पांघरुण, लाकडी सामान यांच्यामध्ये आढळून येणारं ढेकूण अत्यंत त्रासदायक ठरतं. म्हणूनच, रात्रभर झोप मोड करणाऱ्या या ढेकणांना घरातून कसं पळवून लावायचं ते जाणून घेऊयात. (home-cleaning-protecting-home-from-bed-bugs)

१. ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस अत्यंत फायदेशीर आहे. या रसाचा वास ढेकणांना सहन होतं नाही. त्यामुळे त्यांच्या श्वास घेण्यास अडचण निर्माण होते व ते मरतात. म्हणूनच ढेकूण होत असलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा.

ढेकणांच्या समस्येने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय
सतत केस गळतायेत?; घरगुती उपायांनी करा समस्या दूर

२. निलगिरीच्या तेलात रोजमेरी, लव्हेंडर तेल मिक्स करुन हे तेलदेखील ढेकणांना प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी लावू शकता.

३. ज्या ठिकाणी ढेकूण झाले आहेत त्या ठिकाणी कडुलिंबाची पानं, तेल किंवा कडुलिंबाच्या पाण्याचा स्प्रे शिंपडावा.

४. गादी, पांघरुण किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकूण आढळल्यास त्या ठिकाणी निलगिरीचे थेंब शिंपडा.

ढेकणांच्या समस्येने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय
दाढीचे पांढरे केस काळे करण्यासाठी करा 'हे' उपाय

५. लव्हेंडरची पाने कपड्यांवर घासल्यास कपड्यांवरील ढेकूण निघून जातात.

६. घरात भरपूर सुर्यप्रकाश येऊ द्यावा. दिवसा दार-खिडक्या बंद ठेऊ नये.

७. ढेकणांना पुदिन्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी उशाजवळ पुदिन्याची ताजी पान ठेवावीत.

८. घरातील ओलसर दमट वातावरण टाळावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com