

Home Garden Inspiration
esakal
पुष्पा दरेकर
मला झाडांची, फळांची लहानपणापासून खूपच आवड होती. लग्नानंतर आमचे कौलारू घर होते; पण थोड्या वर्षांनी आम्ही बंगल्यात राहायला गेलो. आता मुलींचीही शाळा- कॉलेजेस होऊन मुली लग्न करून सासरी गेल्या आणि मला बागेची आवड जोपासायला वेळच वेळ मिळू लागला. मी खूप फुलझाडे लावली आहेत. जाईजुई, पारिजात, मोगरा, चाफा, झेंडू आणि नाना प्रकारच्या फुलांचा सुगंध मन आनंदित करतो. चिक्कू, आंबा, केळी, अंजीर, नारळ इत्यादी झाडे लावली आहेत. फळांनी भरलेली झाडे पाहून आनंद होतो. चिक्कूच्या झाडाला तर खूप चिक्कू लागतात; पण फक्त पाहावे लागतात. शुगर असल्यामुळे खाता येत नाही; पण आमचे यजमान नातवंडांना भरभरून चिक्कू घेऊन जातात. तेव्हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप समाधान वाटते.