Health: सततची डोकेदुखी असले, तर आता पेनकिलर ऐवजी या घरगुती उपायांनी दुर करा डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Remedies to Cure Headache

Health: सततची डोकेदुखी असले, तर आता पेनकिलर ऐवजी या घरगुती उपायांनी दुर करा डोकेदुखी

सतत डोके दुखत राहणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्यांना कधीही डोकेदुखीचा त्रास झाला नसेल. तुम्हाला माहित का की असे काही लोक आहेत ज्यांची सकाळच डोकेदुखीने सुरू होते.

डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. कधी कधी असे होते की आपल्याला डोकेदुखीचे कोणतेही कारण समजत नाही.अशा परिस्थितीत बरेच लोक नेहमीच डोकेदुखीच्या वेळी पेनकिलर घेतात. त्यांना पेनकिलर खाण्याची इतकी सवय होते की त्यांना माइल्ड पेन असला तरी ते पुन्हा पुन्हा पेनकिलर घेण्यास सुरुवात करतात. तर नेहमी पेनकिलर खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पुढे चालून आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्याही उद्भवू शकतात.

चला तर मग आज जाणून घेऊ या की डोकेदुखीचा त्रास असल्यास तुम्ही गोळी ऐवजी कोणते घरगुती उपाय करू शकता.

हेड मसाज - डोकेदुखीला हेडमसाज हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुमचे डोके दुखत असेल तर तुम्ही कोणत्याही तेलाने 10 ते 15 मिनिटे मस्त हेड मसाज करा. यामुळे तुमच्या मज्जातंतूंना खूप आराम मिळतो आणि आपोआप आपल्या डोकेदुखीपासूनही सुटकारा मिळते.

पाणी - तुम्हाला माहित का कधी कधी कमी पाणी पिल्यामुळे सुध्दा डोके दुखते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवा आणि कमीत कमी दोन ग्लास थंड पाणी प्यावे. त्यामुळे डोकेदुखीला लगेच आराम मिळतो.

आइस पॅक - बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा आणि कपाळावर हलके दाबा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. काही वेळाने कपाळावर आइस पॅकही लावू शकता. डोकेदुखी बरी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

लैव्हेंडर ऑइल - लैव्हेंडर ऑइलचा वापर अरोमाथेरपीमध्ये केला जातो. यामुळे तुम्हाला शांतता आणि आराम मिळतो. यासाठी प्रथम लॅव्हेंडर तेल गरम करा आणि अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे सुगंध चांगल्या पद्धतीने येईल

हेही वाचा: Health Tips : हे दोन पाँईंट दाबा आणि शुगर पूर्ण कंट्रोल करा

हॉट राइस बॅग - यासाठी तुम्हाला कच्चे तांदूळ तव्यावर गरम करावे लागतील. यानंतर हे तांदूळ एका पॉलीबॅगमध्ये भरून ठेवा. याच्या मदतीने तुम्ही कपाळावर शेक घेऊ शकता. यामुळे तुमची डोकेदुखीही बऱ्याच अंशी बरी होते.

ब्रीदिंग एक्सरसाइज - किमान 10 मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज करा. हा व्यायाम केल्याने तुम्हाला खूप आराम मिळतो. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे मज्जातंतूंना खूप आराम मिळतो.

आयुर्वेदिक चहा - आयुर्वेदिक चहा देखील डोकेदुखी बरा करण्यासाठी प्रभावी इलाज मानला जातो. तुम्ही मसाला चहा देखील पिऊ शकता. चहा गरमागरम सिप-सिप करुन पिण्याचा प्रयत्न करा.पण थंड चहा पिऊ नका कारण थंड चहामुळे तुमची डोकेदुखी वाढू शकते.