Home Tips : 'या' टिप्सने पिकलेली केळी आठवडाभर राहतील फ्रेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Tips

Home Tips : 'या' टिप्सने पिकलेली केळी आठवडाभर राहतील फ्रेश

Tricks to Store Bananas : केळी हे असे फळ आहे जे स्वस्त आणि हेल्दी आहे. त्यामुळे फिटनेस फ्रिक लोकं, आजारी किंवा फूडी अशा सर्वांनाच केळी खायला आवडतात. त्यामुळे बहुतेक प्रत्येकच घरात केळी असतात. केळी डझनांनीच खरेदी करावी लागतात. त्यात सगळ्यात लवकर खराब होणारं फळही तेच आहे.

हेही वाचा: Home Tips : दूध उकळण्याच्या 'या' ट्रिक्स वापरा, भांडे खराब नाही होणार

त्यामुळे केळी कशी साठवावी हा मोठा प्रश्न असतो. कच्ची आणली तर खाता येत नाही आणि पिकलेली घेतली तर लगेच संपवावी लागतात. अशावेळी पिकलेली केळी आठवडाभर व्यवस्थित टिकवण्यासाठी आम्ही काही ट्रिक्स सांगत आहोत. जाणून घ्या.

हेही वाचा: Home Tips : धान्य-पिठात सोनकिडे झालेत? 'या' ट्रिक्सने वापरा

ट्राय करा या टिप्स

  • केळी खरेदी करून आणल्यावर त्यांच्या देठावर पेपर किंवा प्लास्टिक रॅप करावे.

  • बाजारात केळीचे हँगर मिळते. त्यावर टांगल्याने केळी बराच काळ टिकतात.

  • व्हिटॅमिन सी ची टॅबलेट पाण्यात विरघळून त्या पाण्यात केळी बूडवून ठेवावी. त्यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.

हेही वाचा: Home Tips : धान्य-पिठात सोनकिडे झालेत? 'या' ट्रिक्सने वापरा

  • केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. केळी नेहमी सामान्य तापमानातच ठेवावी.

  • केळी वॅक्स पेपरने झाकून ठेवावी.

  • पाण्यात सोडा घालून त्यात थोड्यावेळ भिजवून ठेवावे. नंतर ती केळी खोलीतल्या सामान्य तापमानात ठेवावे.

  • आंबट फळांमध्ये सायट्रिक ॲसिड असते. या फळांच्या सरात केळी भिजवत ठेवली तर ते लवकर खराब होणार नाही आणि काळीपण पडणार नाही.

Web Title: Home Tips Banana Storage Tricks Use These Tips And Keep It Fresh For A Week

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bananaeasy home tips