esakal | DIY: शिजवलेल्या भाताचा होममेड फेस पॅक

बोलून बातमी शोधा

DIY: शिजवलेल्या भाताचा होममेड फेस पॅक
DIY: शिजवलेल्या भाताचा होममेड फेस पॅक
sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : तांदळाचा उपयोग आपण जास्त करून अन्न तयार करण्यासाठीच करतो. अनेक वेळा आपण तांदूळ शिजवल्यानंतर ते जरूरीपेक्षा ज्यादा तयार होते. तेव्हा आपण हे शिजवलेला भात टाकून देतो. परंतु याच शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण फेस पॅक तयार करू शकतो आणि हे तुमच्या चेहऱ्याला अत्यंत फायदेशीर ठरते.ज्यादातर तांदळाच्या पिठाचा उपयोग हा फेस पॅक साठी केला जातो. परंतु तांदळाचा उपयोग सुद्धा आपण फेस पॅक साठी किंवा त्वचेच्या वेगवेगळ्या देखभालीसाठी करू शकतो. या पासून तयार झालेले फेस पॅक त्वचेमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करते. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी त्याच बरोबर चेहऱ्याच्या पेशी मजबूत होण्यासाठी वापर करू शकता.

शिजवलेला भात आणि अंड्याचा फेस मास्क

अंड्यामधील पांढरा भाग हा नेहमी त्वचा मजबूत करण्यासाठी वापरला जातो. हा भाग तांदळामध्ये मिळवून त्यापासून फेसपॅक तयार केले तर त्याचे चांगले परिणाम चेहऱ्यावर दिसतात.

आवश्यक साहित्य

शिजवलेला भात एक वाटी,

अंडे 2

तयार करण्याची पद्धत

शिजवलेला भात मिक्सरमध्ये घालून त्याची चांगली पेस्ट करा. अंडे फोडून त्यातला पांढरा भाग वेगळा करा.

तांदळाच्या पेस्टमध्ये अंड्यातील पांढरा भाग घालून ते चांगल्या पद्धतीने फेसून घ्या. त्यानंतर तयार झालेले मिश्रण फेसपॅक म्हणून वापरू शकता.

वापर करण्याची पद्धत

प्रथम चेहरा चांगल्या पद्धतीने क्लिंजर च्या साह्याने स्वच्छ करा. पूर्ण चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने फेस पॅक लावा. हे फेस पॅक 20 मिनिटापर्यंत चेहऱ्यावर आणि मानेवर ठेवा. वीस मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. हे फेस पॅक आपण आठवड्यातून दोन वेळा वापर करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा अधिक मजबूत होते.

शिजवलेला भात आणि मध

मध नेहमी आपल्या चेहर्‍यावरील त्वचा मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतो. भातामध्ये मध मिसळून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावरील सुरकुत्या होण्यापासून वाचवतो.

आवश्यक साहित्य

शिजवलेला भात एक वाटी.

मध दोन चमचा

तयार करण्याची पद्धत

शिजवलेल्या भाताला मिक्सरमध्ये घालून त्याची चांगल्या पद्धतीने पेस्ट करा. एका बाउल मध्ये भाताची पेस्ट घेऊन त्यामध्ये मध मिक्स करा. दोन्ही साहित्य चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर फेस पॅक तयार होईल.

वापरायची पद्धत

चेहरा आणि मान चांगल्या पद्धतीने स्वच्छ धुऊन त्यावर फेस पॅक लावा. हे फेस पॅक 15 मिनिटापर्यंत त्वचेवर ठेवा. पंधरा मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुऊन घ्या. हे फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एक वेळा वापरू शकता एक महिना अशापद्धतीने फेसपॅक चा वापर केल्यास तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा लुक येईल आणि चेहऱ्यावरील पेशीही मजबूत होतील.