esakal | केसांची घ्या काळजी; घरीच तयार करा नैसर्गिकरित्या हेअर पॅक

बोलून बातमी शोधा

केसांची घ्या काळजी; घरीच तयार करा नैसर्गिकरित्या हेअर पॅक

अनेकदा ऋतू बदलला कि त्याचा परिणाम केसांवर आणि त्वचेवर होतो.

केसांची घ्या काळजी; घरीच तयार करा नैसर्गिकरित्या हेअर पॅक
sakal_logo
By
शर्वरी जोशी

स्त्रियांचं खरं सौंदर्य त्यांच्या केसांमध्ये असतं, असं कायम म्हटलं जातं. त्यामुळेच आपलेदेखील लांबसडक, दाट आणि काळेभोर केस असावेत असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यामुळे स्त्रिया केसांच्या आरोग्यासाठी आणि त्यांची निगा राखण्यासाठी विविध उपाय करत असतात. अनेकदा ऋतू बदलला कि त्याचा परिणाम केसांवर आणि त्वचेवर होत असतो. यात बऱ्याचदा केस गळणे, डोक्यात कोंडा होणे, सतत केसांमध्ये घाम येणे वा डोक्यात उवा होणे अशा समस्या निर्माण होता. उन्हाळ्यात तर या समस्येचं प्रमाण जास्तच वाढतं. त्यामुळे केसांचं आरोग्य जपण्यासाठी असे काही हेअर पॅक आहेत,  जे घरच्या घरी सहज करता येऊ शकतात. विशेष म्हणजे त्यामुळे कोणते साईड इफेक्टसही होत नाहीत.

१. आवळ्याचा हेअर पॅक -

 आवळा हा केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. त्यामुळे आवळ्याचा हेअर पॅक वापरल्यामुळे केसांच्या सगळ्या समस्या दूर होतात. हा हेअर पॅक तयार करण्यासाी वाळलेले आवळा पाण्यात उकळून घ्या, त्यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये मेथीची पावडर किंवा वाफवलेल्या मेथीच्या बिया टाका. सोबतच २ चमचे दहीदेखील टाका. त्यानंतर हा पॅक एकत्र करुन तो अर्धा तास केसांना लावून ठेवा. आठवड्यातून तीन दिवस हा उपाय केल्यास केस गळती बंद होईस. 
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर आहे. तर मेथी थंड, एंटीसेप्टिक आणि प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. 

२.  अंड्यांपासून तयार करा हेअर पॅक -

क्लोरीनच्या पाण्याने सतत केस धुतल्यामुळे ते खराब होतात. त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यासाठी दोन अंडी फेटून त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण केसांवर लावा आणि शॉवर कॅपने झाकून ठेवा. 20 मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या. अंड्यांमुळे केसांची वाढ होते. अंड्यात व्हिटॅमिन ए, बायोटिन आणि व्हिटॅमिन ई असते, जे केसांना पोषण आणि मॉइश्चरायझ करते.

हेही वाचा : डोंबिवली- ठाण्याजवळची ५ वॉटरपार्क, एकदा तरी नक्की भेट द्या

३. बटाटा हेअर पॅक -

एक मोठा बटाटा किसून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी वेगळं करा. या पाण्यात २ चमचे मध, कोरफड मिक्स करा आणि या पॅकने केसांच्या मुळीशी मालिश करा. त्यानंतर दोन तास हा पॅक केसांवर ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करा.

( लेखिका डॉ. रिंकी कपूर या मुंबईतील एस्थेटिक क्लिनिक अँड फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक डमॉटोलॉजिट आणि डर्मेटो-सर्जन आहेत.)