थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Winter Lip Care Tips: बाजारातील केमिकलयुक्त बाम वापरण्याऐवजी नैसर्गिक घटकांपासून तयार करा हा गुणकारी लिप बाम; ओठ होतील गुलाबी, मऊ आणि सुंदर...
DIY Parijat Flower Lip Balm Recipe for Soft Lips

DIY Parijat Flower Lip Balm Recipe for Soft Lips

esakal 

Updated on: 

Parijat Flower Lip Balm: हिवाळ्याच्या दिवसांत गुलाबी थंडीसोबतच ओठ फुटणे, कोरडे पडणे आणि त्वचा निस्तेज होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा ओठ इतके ड्राय होतात की त्यातून रक्त येऊ लागते किंवा वेदना व जळजळ जाणवू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असणारे रेडीमेड लिप बाम आणून वापरतो. पण, या उत्पादनांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात, ज्यामुळे ओठांचे रक्षण होण्याऐवजी त्यांचे नुकसान होते आणि ओठ हळूहळू काळे पडू लागतात.

या रासायनिक दुष्परिणामांपासून ओठांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी घरच्या घरी 'पारिजातकाच्या फुलांचा' वापर करून प्रभावी लिप बाम तयार करता येतो. निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या पारिजातकाच्या फुलांमध्ये ओठांना खोलवर पोषण देणारे आणि मॉइश्चराइज करणारे जादुई गुणधर्म असतात. कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय हा घरगुती लिप बाम कसा तयार करायचा, याची सविस्तर पद्धत खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...