
अक्षया हिंदळकर - अभिनेत्री
माझ्या आईचं नाव सुरेखा. ती मला लाडानं मृगसी, अक्षू असं म्हणते. आईच्या दिवसाची सुरुवातच आपल्यापासून होते. आपल्या विचारानं, आपल्या काळजीनं होते आणि तिच्या दिवसाचा शेवटही आपल्या विचारांनी आणि आपल्या काळजीनं होतो. माझ्या दिवसाची सकाळही आई या शब्दाने होते आणि रात्री झोपतानादेखील आईच्याच हाकेने झोपते. आईशिवाय माझी कोणतीही गोष्ट होऊ शकत नही.