

राजीव तांबे
घरातल्या कुणाचाही वाढदिवस हा एकतर ‘केक सोहळा’ तरी असतो किंवा तो ‘इव्हेंट’ तरी असतो. इव्हेंट म्हणजे सर्व घरातल्यांनी ‘बाहेर’ जेवायला जाणं आणि मग हॉटेलात ‘केक सोहळा’ दंगा करत पार पाडणं. दंगाही असा, की हॉटेलातील इतरांना त्याचा व्यवस्थित त्रास व्हावा.
या सोहळ्यात आणि इव्हेंटमध्ये एकदा का केक कापून झाला, की ज्या मुलाचा वाढदिवस आहे तो बाजूलाच राहतो आणि जो-तो खाण्यात, पिण्यात आणि मोबाईल पाहण्यात गुंगून जातो (काही सन्माननीय अपवाद वगळून)