Water intake in Winters : हिवाळ्यात जर तुम्ही पाणी पिणं कमी केलं असाल तर, आताच सावध व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water intake in Winters

Water intake in Winters : हिवाळ्यात जर तुम्ही पाणी पिणं कमी केलं असाल तर, आताच सावध व्हा

How much Water should we drink in Winter : पाणी तर सर्वच पितात. पण पाणी पिण्याची योग्य पध्दत, वेळ तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शरीरात सर्वाधिक पाणीच असतं. पण फक्त योग्य वेळेत आणि योग्य पध्दतीने पाणी न पिल्यानं डोकं दुखणं, जाड होणं, पचना संबंधित त्रास होऊ शकतात.

Water intake in Winters

Water intake in Winters

पाणी पिणं का आवश्यक आहे

आपल्या शरीरात ७५ टक्के पाणी असतं. लहान मुलांच्या शरीरात ८०-८५ टक्के पाणी असतं. पाणी कमी प्यायल्यानं आपल्याला डीहायड्रेशन होऊ शकतं. जर वयस्क व्यक्तीने पाणी कमी प्यायलं तर त्याला सतत दवाखान्यात भरती होण्याची वेळ येते.

Water intake in Winters

Water intake in Winters

किती पाणी प्यावं?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळ, जागा, ऋतूच्या नुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. कायम पाण्याची बाटली हाताशी असावी आणि तहान लागताच पाणी प्यावं. एकाच वेळी ३-४ ग्लास पाणी पिऊ नये. थोड्या थोड्या वेळात पाणी पित रहावं.

सकाळी उठताच पाणी का प्यावं

रात्रभरात शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यावं. नाहीतर रक्त घट्ट होत जातं आणि हृदयव्काराचा झटरा येऊ शकतो.

टॅग्स :waterWinterwinter session