Drinking water tips: शरीरातील Toxins घालवण्यासाठी एक तासात किती पाणी प्यावे? जाणून घ्या

कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन होतं.
water
watersakal

तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया आणि टॉक्झिन्स घालवण्यासाठी भरपूर पाणी पिणे फार आवश्यक असते. पाण्याला सगळ्यात जास्त हेल्दी ड्रिंक मानले जाते. त्यामुळे दररोज निरोगी राहाण्यासाठी पाणी पिणे गरजेचे ठरते. तसेच शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यासाठीही पाणी पिणे आवश्यक ठरते. मात्र अनेकजण तासंतास पाणी पित नाहीत. कमी किंवा अतिप्रमाणात पाणी पिण्याचेही घातक परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे नेमकं तासाभऱ्यात किती पाणी प्यायचं ते जाणून घ्या.

मर्यादित पाणी पिण्याचे फायदे आणि कमी पाणी पिण्याचे तोटे जाणून घेऊया

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, पाणी शरीरात अनेक प्रकारचे फंक्शन करतो. जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे

  • पाणी शरीरातील सेल्स पर्यंत पोषत तत्व आणि ऑक्सिजन पोहोचवतं.

  • पचनशक्ती वाढवण्यास पाण्याची मदत होते.

  • कफपासून तुमचा बचाव करते.

  • बीपी लेवल कंट्रोलमध्ये ठेवतं.

  • शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत करतं.

  • तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण नियंत्रित ठेवतं.

water
Eating Empty Stomach Raisins: भिजवलेले मनुके हिमोग्लोबिन वाढीसाठी मदत करतात; कसं ते जाणून घ्या...

कमी पाणी पिल्यास होतात हे नुकसान

कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन होतं. ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे, विकनेस, तोंड कोरडे करणे, कोरडा खोकला, लो ब्लड प्रेशर, पाय सुजने, मसल्स क्रँप यांसारख्या समस्या उद्भवतात.

1 तासात किती पाणी प्यावे?

एका तासात तुम्ही किती पाणी प्यावे ते तुमच्या वयावर, फिजीकल अॅक्टिव्हिटी, लिंग, तापमान आणि बॉडी वेटवर आधारित असतं. एक्सपर्ट्स दर तासाने दोन ते तीन कप पाणी पिण्यास सांगतात. जर हवामान गरम असेल किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर याचं प्रमाण वाढू शकतं. हेल्दी व्यक्तीने एका दिवसात २-३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com