नवऱ्यांनो, लग्नानंतर कशी घ्याल बायकोची काळजी? फॉलो करा या टीप्स...

नवऱ्यांनो, लग्नानंतर कशी घ्याल बायकोची काळजी? फॉलो करा या टीप्स...

लग्नाच्या धामधुमीत एकीकडे घरच्यांना बघून उत्साह आणि आनंदाची भावना असते, तर दुसरीकडे नववधूला खूप भावना दाटून आलेल्या असताक, कारण लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असताना, नवीन घराचे नवे नियम तिला अनेक गोष्टींपासून रोखतात. लग्नानंतर नव्या सुनेला घरात जुळवून घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र अशावेळी तुम्ही त्यांना किती समजून घेता, साथ देता ते महत्वाचे आहे. कारण तुमचे थोडेसे प्रेम आणि तुमचा पाठिंबा तुमच्या पत्नीच्या मनातील सर्व समस्या दूर करू शकतो.

नवऱ्यांनो, लग्नानंतर कशी घ्याल बायकोची काळजी? फॉलो करा या टीप्स...
तुमच्या होणाऱ्या पार्टनरला 'या' सात सवयी असतील तर सावधान...

प्रायव्हसी जपा

तुमच्या पत्नीच्या चुकीमुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना राग येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यांच्या प्रायव्हसीचे रक्षण केले पाहिजे. त्यांना थोडी स्पेस दिली पाहिजे. तुमची पत्नी संयुक्त कुटुंबातील नसेल कदाचित. त्यांना खूप लोकांमध्ये मिसळण्याची सवयही नसेल. अशावेळी तुम्ही तिच्यासोबत असावे असे वाटत असेल तर तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. घरात एकत्र राहत असताना, तुम्ही त्यांची प्रायव्हसी आणि त्यांच्या आरामाची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा तिला तुमची आणि तुमच्या कुटुंबाविषयी आपलेपणा वाटेल. तेव्हा ती हळूहळू मिसळायला लागेल.

नवऱ्यांनो, लग्नानंतर कशी घ्याल बायकोची काळजी? फॉलो करा या टीप्स...
यशस्वी लग्नासाठी दोघांच्या वयामध्ये हवं किती अंतर?

करिअरचे स्वातंत्र्य

लग्नानंतर बायकोने नोकरी करण्याची गरज नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. असे करून तुम्ही त्यांच्या भावना दुखावता. तसेत तिच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता असते. जर तुम्ही बायकोच्या करिअरविषयी गरजेपेक्षा जास्त मत प्रदर्शित करत असाल तर त्याचा नातेसंबंधावर परिणाम होईल. जर तुमच्या बायकोला लग्नानंतरही नोकरी करायची असेल तर तिला पूर्ण सहकार्य केले पाहिजे.

खाण्या-पिण्याकडे लक्ष

सासरच्या लोकांनी लक्षात ठेवावे की मुलीने तुमच्या मुलासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपले घर सोडले आहे. अशा वेळी त्यांच्या खाण्या-पिण्यापासून त्यांच्या छोट्या-छोट्या सवयींची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यांना काय खायला आवडते ते मोकळेपणाने विचारा. त्याच्या आवडीचे पदार्थ करा, त्यामुळे तिला तुमचे घर तिच्या घराप्रमाणेच वाटेल त्यामुळे तिला आणखी मोकळेपणा वाटेल. एवढेच नाही तर तुमच्या बायकोला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यांची निवड त्यांच्या आनंदाचे कारण बनू शकते. जर तुम्ही त्यांच्या आवडीनिवडी जपल्या नाहीत तर तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहणार नाही.

कुटुंबाशी बोलू द्या

लग्नानंतर सुनेला तिच्या माहेरच्या घरी जायचे असते. किंवा ती फक्त तिच्या आईवडिलांना फोन करून बोलत राहते. असे तिने केले की, अनेक घरांमध्ये, सासरच्या लोकांना खूप वाईट वाटते. कदाचित तुमचा असा विचार करणे किंवा तुमच्या पत्नीला त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांशी बोलण्यापासून रोखल्याने ती अपसेट होऊ शकते. ती तिचे कुटुंब सोडून आली आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. [त्यांच्यासाठी हा पूर्णपणे नवीन अनुभव आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यांना माहेरी फोन करून बोलण्यास सांगू शकता. त्यांचे कुटुंबीय, मित्र-मैत्रीणी त्यांना भेटायला येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com