
PAN Card For Child: भारतात अनेक आर्थिक आणि कायदेशीर कामासाठी पॅन कार्ड हे आवश्यक असते. आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत किंवा गुंतवणूक सुरू करण्यापर्यंत, पॅन कार्ड गरजेचे असते. पॅन कार्ड केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींपुरते मर्यादित नाहीत. आयकर कायद्याच्या कलम 160 अंतर्गत, अल्पवयीन मुले देखील पॅन कार्ड काढू शकतात. यालाच मायनर पॅन कार्ड म्हणतात. हे कार्ड जरी अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने काढले केले गेले असले तरी, ते मूल प्रौढ होईपर्यंत फक्त त्यांचे पालक वापरू शकतात. मायनर पॅन कार्ड काढण्यासाठी कोणत्या स्टेप फॉलो कराव्या हे जाणून घेऊया.