Simple Door Hacks: दरवाजा उघडताना अन् बंद करताना करकर आवाज येतोय ? मग 'या' सोप्या हॅक्सची घ्या मदत

Simple Door Hacks: तुमच्या दारातून कर्कश आवाज येत असेल तर पुढील सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता. ज्यामुळे दरवाजा उघडताना आणि बंद करताना आवाज येणार नाही.
Simple Door Hacks
Simple Door HacksSakal
Updated on

Simple Door Hacks: पावसाळ्यात अनेकवेळा दरवाजा आणि खिडक्या उघड-बंद करताना कर्कश आवाज येतो. या आवाजामुळे अनेकांचा डोकेदुखी वाढू शकते. जर तुमच्या घरी देखील दरवांना आणि खिडक्यांना कर्कश आवाज येत असेल तर चिंता करू नका. तुम्ही पुढील सोप्या टिप्सची मदत घेऊन ही समस्या कमी करू शकता.

दरवाजामधुन येणारा आवाज कसा कमी कराल?

साबणाचा वापर

दारामधून येणारा आवाज कमी करण्यासाठी साबणचा वापर करू शकता. साबणामध्ये असलेले घटक आवाज कमी करतात. त्यामुळे दरवाजा सहज उघडता येतो आणि बंद करता येतो. यासाठी दरवाजाच्या चौकटीला जोडलेल्या कडा आणि स्क्रूवर साबण घासावे.

नट किंवा स्क्रु तपासावे

दाराला लावलेले नट तपासावे. कधी कधी दरवाजाचे नट सैल झाल्यास दरवाजामधून आवाज येतो. नट सैल झाले असेल तर घट्ट करावे. यामुळे दरवाजामधून येणारा आवाज कमी होतो.

पेट्रोलियम जेली

पेट्रोलियम जेली पायांवर पडलेल्या भेगा कमी करण्यास मदत करते. तसेच तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करून दरवाजामधील कर्कश आवाज कमी करू शकता. हाताच्या बोटांनी दरवाजाच्या नटाला पेट्रोलियम जेली लावावी.

Simple Door Hacks
Gastric Headache: तुम्हालाही पोटातील गॅसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय, मिळेल लगेच आराम

कलर करा

दरवाजामधून येणार आवाज कमी करण्यासाठी रंग लावावा. यामुळे दरवाजा सहज उघडता येईल आणि बंद करता येईल. यासाठी दरवाजाला रंग लावताना थोडे तेल लावावे. यामुळे दरवाजामध्ये चिकटपणा राहतो. तसेच दरवाजामधून येणार आवाज कमी होतो.

मोहरी तेल

मोहरीच्या तेलाचा वापर करून दरवाजा आणि खिडक्यांमधून येणार कर्कश आवाज कमी करू शकता. हा एक घरगुती उत्तम पर्याय आहे. यासाठी मोहरीच्या तेल आय ड्रॉपच्या मदतीने दरवाजाच्या नटावर टाकावे किंवा कॉटनच्या मदतीने नट किंवा स्क्रुला तेल लावावे. काही मिनिटांमध्ये दरवाजामधून येणार आवाज कमी होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com