
Be Your Own Valentine : स्वत:च बना स्वत:चे 'व्हॅलेंटाईन', पण कसे?
#BeYourOwnValentine : 'व्हॅलेंटाईन' म्हटलं की प्रत्येकाला एकमेकांच्या प्रेमात बुडालेले जोडपी पटकन आठवतात. 'व्हॅलेंटाईन डे' हा फक्त जोडप्यांपूरता मर्यादित नाही. 'व्हॅलेंटाईन डे' प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुमच्या आयुष्यातील कोणतीही व्यक्ती जिच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, जी तुम्हाला आवडते तिच्यासोबत तुम्ही हा दिवस साजरा करू शकता, मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. तुमचा जोडीदार, तुमचे आई-वडील, तुमचे बहिण-भाऊ, तुमचे मित्र-मैत्रिणी कोणीही तुमचे व्हॅलेंटाईन असू शकते. पण इतर कोणासाठी व्हॅलेंटाईन होण्याआधी तुम्ही सर्वात आधी स्वत:चे व्हॅलेंटाईन व्हायला पाहिजे, मग तुम्ही एकटे असो किंवा नसो.
आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती जर कोणी असेल तर ते आपण स्वत: आहोत. आपल्याला आनंदी राहायचं असेल, इतरांवर प्रेम करायचं असेल तर आधी स्वत:ला आनंदी ठेवावे लागते. आधी स्वत:वर प्रेम करावे लागते. मग या 'व्हॅलेटाईन डे' सर्वात आधी स्वत:चे व्हॅलेंटाईन व्हा. (how to be your own valentine)
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, स्वत:च स्वत:चे 'व्हॅलेटाईन डे' कसे व्हायचे? काळजी करू नका स्वत:वर प्रेम कसे करावे याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Food
तुम्हाला हवं ते खा :
स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या आवडीचे, हवं ते पदार्थ खाणे. कॅलरीज, फॅट्स, वजन कोणताही विचार करून तुम्ही स्वत:ला अडवू नका. तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाऊन, आवडीच्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारा किंवा घरीच तुम्हाला हवा तो पदार्थ बनवून स्वत:ला आनंदी ठेवा.

Watch Movie
तुमच्या आवडीचे चित्रपट, सिरीज बघा :
तुम्हाला एखादा चित्रपट किंवा वेब सिरिज पाहायची आहे पण तुम्हाला कोणी सोबत नाही म्हणून तुम्ही अजून पाहिली नसेल तर आता कोणाचीही वाट पाहू नका. तुम्हाला जो चित्रपट, सिरिज आवडते ते एकट्यानेच पाहा, तेही पॉप कॉर्न, कोल्ड ड्रिंक आणि समोसासोबत. तुम्ही स्वत:ची कंपनी एन्जॉय करायला शिकलात तर नेहमी आनंदी राहू शकता.

Talk or Speak
तुम्हाला जे वाटत स्पष्टपणे व्यक्त करा :
बऱ्याचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीचे वागणे, बोलणे पटत नाही अशा वेळी आपण दुखवलो तरी पण आपण त्यांना काहीच सांगत नाही, असे अजिबात करू नका. तुम्हाला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर ती समोरच्याला नम्रतेने आणि स्पष्टपणे सांगा. दुसऱ्यांचे वागणे, बोलणे स्वत: वर लादून घेऊ नका. तुम्ही समोरच्या सोबत स्पष्टपणे बोलल्यामुळे गैरसमजही होत नाही आणि तुम्ही स्वत:लाही दुखावत नाही.

Sleep
पुरेशी झोप घ्या :
तुम्हाला स्वत:ला आनंदी ठेवायचे असेल, स्वत:चा मूड चांगला ठेवायचा असेल तर पुरेशी झोप घ्या. मस्त उबदार ब्लँकेट किंवा चादर घ्या आणि निवांत झोपा. तुमची झोप चांगली झाली तर आरोग्याही चांगले राहते आणि मनही शांत राहते.

walk
चालायला जा :
चालणे हे आरोग्यासाठी चांगले असते हे सर्वांनाच माहित आहे. तुम्ही नेहमी चालत असाल तर उत्तम पण नसेल तर, स्वत:साठी चालायला सुरुवात करा. ऊबदार जॅकेट, मफलर घेऊन, तुमची आवडती गाणी ऐकत थोडा वेळ चालायला जा. तुम्हाला नक्की छान वाटेल.

Travle
फिरायला जा:
तुमच्या आसपासच्या परिसरातील छान जागा शोधा आणि एकटेच फिरायला जा. एकट्याने फिरण्यामध्येही एक वेगळी मज्जा असते. आसपास घडणाऱ्या गोष्टी आपण पाहतो, अनुभवतो आणि शांतपणे इकडे तिकडे फिरतो....खूप छान वाटते. एकदा ट्राय करा तुम्हाला ही कल्पना नक्की आवडेल.

Write Letter
स्वत:ला एक पत्र लिहा :
होय. तुम्ही स्वत:ला एक पत्र लिहा कारण स्वत:सोबतचा संवाद आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. तुम्हाला स्वत:बद्दल वाटणाऱ्या चांगल्या गोष्टी या पत्रात लिहा. तुम्हाला काय वाटते,तुमच्या मनात काय सुरू आहे, तुम्हाला काय करायचे आहे....सर्व काही लिहा, अगदी मनापासून. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप छान वाटेल.

Be Happy
दुसऱ्यांचे प्रेम किंवा आनंद साजरा करा :
प्रत्येकाला वाटत असते की आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळाल्या तर आपण आनंदी राहू शकत नाही, पण असे अजिबात नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी नाही मिळाल्या किंवा काहीही झाले असले तरी तुम्ही इतरांसाठी नक्कीच आनंदी राहू शकता. दुसऱ्यांचे प्रेम किंवा आनंदामध्ये सहाभागी होऊन तुम्ही आनंदी राहू शकता.

Shopping
तुम्हाला हवी असलेली वस्तू खरेदी करा:
बऱ्याचदा असे होते की, तुम्हाला एखादी घेण्याची खूप इच्छा असते पण त्याची गरज नसते किंवा इतर काही कारणांमुळे तुम्ही घेत नाही. अशी एक तरी वस्तू तुम्ही स्वत:साठी खरेदी करा. स्वत:ला गिफ्ट्स दिल्यामुळे तुम्हाला नक्की चांगले वाटेल.

how to be your own valentine
स्वत:वर प्रेम करा. स्वत:सोबत हा व्हॅलेंटाईन नक्की साजरा करा. #HappyValentineDay
Web Title: How To Be Your Own Valentine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..