How To Burn Extra Calories | दिवाळीतल्या एक्स्ट्रा कॅलरीज जाळायच्या आहेत? मलायका अरोराला फॉलो करा| Fitness Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीतल्या एक्स्ट्रा कॅलरीज जाळायच्या आहेत? मलायका अरोराला फॉलो करा
दिवाळीतल्या एक्स्ट्रा कॅलरीज जाळायच्या आहेत? मलायका अरोराला फॉलो करा

दिवाळीतल्या एक्स्ट्रा कॅलरीज जाळायच्या आहेत? मलायका अरोराला फॉलो करा

दिवाळीत आपण भरपूर तेलकट, तूपकट खातो. व्यायामाला सुट्टी देतो. या काळात चार-पाच दिवस हिंडूनही येतो. तिथे भरपूर वेगळेवेगळे प्रकार खाऊन झालेले असतात. त्यामुळे साहजिकच वर्कआऊडकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. परिणामी एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात. दिवाळीनंतर जेव्हा रूटीन सुरू होतं तेव्हा मग आपल्या शरीरावर वाढत्या वजनाच्या खुणा दिसायला लागलात. त्यावर उपाय म्हणून काहीजण काही दिवस एकवेळ जेवतात. किंवा सकाळ-संध्याकाळ वॉक घेतात. पण त्याने हळूहळू फायदा दिसायला लागतो. दिवाळीत वाढलेल्या एक्स्ट्रा कॅलरीज कशा जाळायच्या याबबत मलायका अरोराने सांगितले आहे.

दिवाळीनंतर इंस्टाग्रामवर Malaikas Move Of The Week म्हणत तिने पोस्ट केली आहे. या दिवाळीत शरीरावर साचलेली एक्स्ट्रा चरबी बर्न करायची असेल, तर पश्चिमोत्तानासन करून बघा, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

असे करा आसन - योगासनांमध्ये बैठ्या प्रकारातील आसनांमध्ये पश्चिमोत्तानासन हे आसन आहे. हे आसन करण्यासाठी पाय लांब करून ताठ बसा. हळूहळू कंबरेतून वाकायचे आणि दोन्ही हाताने दोन्ही पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करायचा. हे करताना पाय गुडघ्यात वाकणार नाहीत याची काळजी घ्यायची. सुरूवातीला हे आसन जमणे अवघड आहे. जर पायाचे अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. यानंतर कपाळ टेकवा. ही स्यिती 10 ते 15 सेंकद टिकवण्याचा प्रयत्न करा.

असे आहेत आसनाचे फायदे

- मनशांती मिळते

- मासिक पाळीसंदर्भातील तक्रारी दूर होतात.

- हे आसन नियमित केल्याने पचनशक्ती सुधारते

- पोट, पाठ, मांड्या, पोटऱ्या यावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

- पित्ताशय, जठर, मुत्राशयाचा व्यायाम होतो.

- मानेपासून पायाच्या घोट्यापर्यंत अवयवांचे स्नायू बळकट होतात.

Web Title: How To Burn Extra Calories After Diwali Follow Malaika Arora Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top