Eco-Friendly Bakra Eid 2025: अशी साजरी करा इको फ्रेंडली बकरी ईद, पर्यावरण दिनानिमत्त जाणून घ्या काही खास टिप्स

Eco-Friendly Bakri Eid Celebration Ideas on Environment Day: बकरी ईद आणि पर्यावरण दिन एकत्र साजरा करताना पर्यावरणस्नेही उपाय वापरुन सण करा खास!
Eco-Friendly Bakra Eid 2025
Eco-Friendly Bakra Eid 2025sakal
Updated on

How to Celebrate Eco-Friendly Bakri Eid: प्रत्येक वर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणे आणि निसर्गाशी सुसंवादी जीवनशैलीचा प्रसार करणे. विशेष म्हणजे, यावर्षी बकरी ईद ६ जून २०२५ रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे.

या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून यंदा बकरी ईद थोडी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करू शकतो का? निसर्गाची काळजी घेत आणि श्रद्धेचा आदर राखत सण साजरा करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. काही सोप्या पण उपयुक्त सवयी अंगीकारल्या, तर त्याचा फायदा निसर्गालाही होईल आणि सगळ्यांच्या आरोग्यालाही.

बकरी ईद पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे ५ उपाय

अन्नाचा अपव्यय टाळा

खाद्यपदार्थ वाया गेले किंवा सडले, की त्यातून मिथेनसारखा गॅस बाहेर पडतो, जो हवामानासाठी हानिकारक असतो. म्हणूनच जेवण आधीच नीट ठरवा, खूप जास्त बनवू नका आणि उरलेलं अन्न फेकून देण्याऐवजी त्याचा उपयोग करा.

पर्यावरणपूरक उत्पादने वापरा

अनेक साफसफाईच्या जुन्या वस्तूंमध्ये असे रसायन असतात जे पाणी दूषित करतात आणि प्राण्यांना त्रास देतात. त्यामुळे अशा वस्तूंच्या जागी लिंबू, बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरसारखे नैसर्गिक उपाय वापरून घर स्वच्छ ठेवता येते.

पुन्हा वापरता येणाऱ्या बाटल्यांचा वापर करा

प्लास्टिकच्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या बाटल्या पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवतात. त्यामुळे स्टील, काचेच्या किंवा अन्य रियुजेबल बाटल्या वापरणे हे अधिक इको फ्रेंडली पर्याय ठरतील.

हंगामी व स्थानिक अन्नपदार्थांना प्राधान्य द्या

स्थानिक व हंगामी उत्पादनांचा वापर केल्याने वाहतुकीचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन दोन्ही कमी होते. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांनाही याचा थेट फायदा होतो.

वनस्पतीजन्य अन्नाचा समावेश वाढवा

प्रामुख्याने मांसाहारावर आधारित आहाराच्या तुलनेत शाकाहारी पर्यायांचा पर्यावरणावर कमी परिणाम होतो. म्हणूनच सणाच्या दिवशीही अन्नात थोडाफार वनस्पतीजन्य पर्यायांचा समावेश केल्यास तो एक सकारात्मक बदल ठरू शकतो.

हे उपाय सोपे असले तरी त्याचा निसर्गावर मोठा परिणाम होतो. सण साजरा करतानाही आपण निसर्गाची काळजी घेऊ शकतो, हाच यामागचा मुख्य विचार आहे. अशा छोट्या गोष्टींमुळे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगलं आणि स्वच्छ वातावरण तयार करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com